Justin Langer On Rishabh Pant 27 Crore Price Tag : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यातील पराभवासह लखनौ सुपर जाएंट्सचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. या सामन्यानंतर रिषभ पंतच्या नेतृत्वासह फलंदाजीतील त्याच्या खराब कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे. यावर लखनौ संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी रोखठोक मत मांडताना पंतसंदर्भात मोठं वक्तव्य केले आहे. २७ कोटी रुपयांची किंमत म्हणजे हमखास चांगली कामगिरी असे नाही, अशा शब्दांत त्यांनी प्राइज टॅगचा मुद्दा गौण असल्याचे सांगत नेतृत्वात पंत कमी पडला हे मान्य केले आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पंतच्या कामगिरीबद्दल काय म्हणाले कोच?
मुंबई इंडियन्स विरुद्धच्या पराभवानंतर रिषभ पंतच्या कामगिरीबद्दल बोलताना लँगर म्हणाले की, " त्याच्या खराब कामगिरीचा पैशांशी काही संबंध नाही. कर्णधारपद सांभाळणं सोपं नसते. त्याच्यावर प्रचंड दबाव आहे, पण तो सातत्याने मेहनत घेत आहे. पंत जेव्हा आत्मविश्वासाने आणि आनंद घेऊन खेळतो, तेव्हा तो सर्वोत्तम फॉर्ममध्ये दिसतो.
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
सराव तगडा, त्यामुळे अजूनही कमबॅकची आस
दोन दिवसांपूर्वीच्या सराव सामन्यात त्याने ३०-४० चेंडूत ९५ धावा केल्या. तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्मपासून फार दूर नाही. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये पाचव्या क्रमांकावर खेळताना अनेक वेळा सामन्याचे पारडे फिरवले आहे, त्यामुळे त्याच्याकडून पुढील सामन्यांत मोठ्या अपेक्षा आहेत, असा विश्वासही लँगर यांनी व्यक्त केला आहे.
हार्दिक पांड्या-मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? LSGविरूद्धचा सामना न खेळण्याचं खरं कारण आलं समोर
पंतची निराशजनक कामगिरी
लखनौ सुपर जाएंट्सच्या संघाने रिषभ पंतसाठी विक्रमी २७ कोटी एवढी मोठी बोली लावून आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या पंतकडे नेतृत्वाची जबाबदारीही देण्यात आली. पण गत हंगामाप्रमाणे यंदाही तो किंमतीप्रमाणे हिंमत दाखवू शकलेला नाही. यंदाच्या हंगामात त्याने पहिल्या ९ डावात २५.५० च्या सरासरीसह १२८.३० च्या स्ट्राईक रेटनं फक्त २०४ धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटमधून फक्त ७ षटकार पाहायला मिळाले आहेत.