काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 18:20 IST2026-05-05T18:16:14+5:302026-05-05T18:20:44+5:30

आसाममध्ये काँग्रेसच्या १९ पैकी १८ जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी, तर केरळमध्ये....

Assembly Election 2026: Most of the winning candidates of Congress are Muslims; Similar trend seen in 5 states | काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...

काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...

Assembly Election 2026 : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांत काँग्रेसच्या विजयी उमेदवारांमध्ये मुस्लिम नेत्यांचे लक्षणीय प्रमाण दिसून आले आहे. आसाम, केरळ, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या राज्यांतील आकडेवारीत हा ट्रेंड स्पष्टपणे जाणवतोय.

आसाममध्ये १९ पैकी १८ जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी

आसाममध्ये इंडियन नॅशनल काँग्रेसला मिळालेल्या १९ जागांपैकी १८ जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी झाले. पक्षाने एकूण २० मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली होती, त्यापैकी १८ जणांनी विजय मिळवला. याशिवाय, काँग्रेसचा मित्रपक्ष राजोर दल यांनाही २ जागा मिळाल्या, ज्यात एका मुस्लिम उमेदवारासोबत अखिल गोगोई यांनी विजय मिळवला.

केरळमध्ये ३५ मुस्लिम आमदार

१४० सदस्यीय केरळ विधानसभेत ३५ मुस्लिम आमदार निवडून आले. यापैकी ३० आमदार काँग्रेसप्रणित UDF आघाडीतील आहेत. यात काँग्रेसचे ८ आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगचे २२ आमदार आहेत.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू

पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला फक्त २ जागा जिंकता आल्या आणि या दोन्ही जागांवर मुस्लिम उमेदवार विजयी झाले आहेत. तर, तामिळनाडूमध्ये काँग्रेसच्या २ मुस्लिम उमेदवारांपैकी १ उमेदवार विजयी झाला आहे.

विधानसभा निकाल

पश्चिम बंगालमध्ये भाजपने २०६ जागा जिंकून दोन-तृतीयांश बहुमत मिळवले, तर आसाममध्येही भाजपप्रणित NDA ने १२६ पैकी १०२ जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज केली.

तामिळनाडूमध्ये पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या थलापती विजय यांचा TVK सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला, तर केरळमध्ये १० वर्षांनंतर १०२ जागांसह UDF ला स्पष्ट बहुमत मिळाले. तर, CPI(Marxist) प्रणित LDFला ३५ आणि भाजपला ३ जागा मिळाल्या. 

Web Title : कांग्रेस के अधिकतर विजयी उम्मीदवार मुस्लिम; 5 राज्यों में दिखा ऐसा ही ट्रेंड

Web Summary : हाल के विधानसभा चुनावों में कांग्रेस के विजयी उम्मीदवारों में मुस्लिम नेताओं की महत्वपूर्ण संख्या देखी गई, खासकर असम, केरल, पश्चिम बंगाल और तमिलनाडु में। बीजेपी ने पश्चिम बंगाल और असम जीता, जबकि यूडीएफ ने केरल में जीत हासिल की। तमिलनाडु में टीवीके सबसे बड़ी पार्टी बनकर उभरी।

Web Title : Congress's Winning Candidates Mostly Muslim; Similar Trend in 5 States

Web Summary : Recent assembly elections show a significant number of Muslim leaders victorious for Congress, notably in Assam, Kerala, West Bengal, and Tamil Nadu. BJP won West Bengal and Assam, while UDF secured Kerala. TVK emerged biggest party in Tamil Nadu.