IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली

DC ला मोठा दिलासा, CSK  दोन बदलासह उतरला मैदानात

By सुशांत जाधव | Updated: May 5, 2026 19:32 IST2026-05-05T19:28:07+5:302026-05-05T19:32:36+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 DC vs CSK Delhi Capitals Wins The Toss Looks To Bat First Lungi Ngidi in place of Kyle Jamieson Akeal Hosein and Gurjapneet Singh Back In Chennai Super Kings XI | IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली

IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली

IPL 2026 DC vs CSK : दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत आगेकूच करण्याच्या इराद्याने मैदानात उतरले आहेत. या महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेल याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

DC ला मोठा दिलासा, CSK  दोन बदलासह उतरला मैदानात

दिल्ली कॅपिटल्सला या सामन्यात मोठा दिलासा मिळाला आहे. कारण  दुखापतीतून सावरून लुंगी एनिग्डी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाला आहे. कायले जेमिसनच्या जागी त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली आहे.  दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दुखापतग्रस्त रामकृष्ण घोषसह दोन बदलासह मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. फिरकीपटू अकिल होसीन आणि गुरजपनीत सिंग यांनी चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने कमबॅकची संधी दिली आहे.

२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं

दिल्ली पराभवाची परतफेड करणार?

यंदाच्या हंगामातील दोन्ही संघातील हा दुसरा सामना आहे. याआधीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सच्या  २३ धावांनी पराभूत केले होते. घरच्या मैदानात या पराभवाची परतफेड करत दिल्ली कॅपिटल्स  दिल्ली कॅपिटल्स गुणतालिकेत आपले स्थान अधिक भक्कम करण्यासाठी प्रयत्नशील असेल.

चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग इलेव्हन : संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवॉल्ड ब्रेविस, जेमी ओवर्टन, अकिल होसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, मुकेश चौधरी, गुरजपनीत.

  • चेन्नई सुपर किंग्ज इम्पॅक्ट प्लेयर्स: शिवम दुबे, प्रशांत वीर, मॅथ्यू शॉर्ट, आकाश मधवाल, सरफराज खान
     

दिल्ली कॅपिटल्स  प्लेइंग इलेव्हन :

केएल राहुल (यष्टीरक्षक, पथुम निसंका, करुण नायर, ट्रिस्टन स्टब्स, नितीश राणा, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, लुंगी एनिग्डी, टी नटराजन.

  • दिल्ली कॅपिटल्स इम्पॅक्ट प्लेयर्स : विपराज निगम, समीर रिझवी, अभिषेक पोरेल, औकीब नबी दार, डेविड मिलर

Web Title : आईपीएल 2026: डीसी की वापसी की रणनीति, सीएसके मैच विजेता के साथ मजबूत।

Web Summary : अरुण जेटली स्टेडियम में डीसी का मुकाबला सीएसके से है। डीसी ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का फैसला किया। एनगिडी डीसी के लिए लौटे, जबकि सीएसके ने होसैन और गुरजपनीत को मैदान में उतारा। सीएसके ने पहले डीसी को हराया था। दिल्ली घर पर बदला लेना चाहती है।

Web Title : IPL 2026: DC's comeback strategy, CSK strengthens with match-winner return.

Web Summary : DC faces CSK at Arun Jaitley Stadium. DC chose to bat first after winning the toss. Ngidi returns for DC, while CSK fields Hosein and Gurjapneet. CSK previously defeated DC. Delhi seeks revenge at home.