चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉपला

By सुशांत जाधव | Updated: May 5, 2026 20:31 IST2026-05-05T20:30:15+5:302026-05-05T20:31:37+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
How DC KL Rahul Remove Test Player Tag Super Striker Havoc Batting In IPL 2026 Revealed Inside Story | चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"

चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"

IPL 2026 : टीम इंडियाचा स्टायलिश बॅटर लोकेश राहुल यंदाच्या हंगामात सर्वोत्तम कामगिरीसह सुपर स्ट्राइक रेटसह आपल्या फलंदाजीतील आक्रमक अंदाज दाखवून देताना दिसतोय. स्ट्राइक रेटच्या मुद्यावरुन अनेकदा स्टायलिश क्रिकेटरला ट्रोल करण्यात आले. एवढेच नाही तर टीम इंडियाच्या टी-२० संघाचे दरवाजेही त्याच्यासाठी बंद झाले. पण दिल्ली कॅपिटल्सच्या संघात आल्यापासून त्याचे तेवर बदलले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉपला

यंदाच्या हंगामात तर तो तुफान फटकेबाजीचा नजराणा पेश करत ऑरेंज कॅपच्या शर्यतीत युवा बॅटर्संना टक्कर देताना दिसतोय. चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात तो स्वस्तात माघारी फिरला. पण यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत तो टॉपला पोहचला. लोकेश राहुलनं १० सामन्यातील १० डावात ४९.४४ च्या सरासरीसह १८०.८९ स्ट्राइक रेटसह ४४५ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकासह एका शतकाचा समावेश आहे. संयमी फलंदाजीसाठी ओळखला जाणारा लोकेश राहुल आक्रमकतेसह घातक फलंदाज कसा झाला? जाणून घेऊयात त्यासंदर्भातील खास गोष्ट

२७ कोटींच्या प्राइज टॅगवर कोच लँगर यांचं मोठं वक्तव्य; पंतच्या फ्लॉप शोमागचं कारणही सांगून टाकलं

चौकट मोडून काढल्याचा अभिमान  

जिओस्टारच्या सुपरस्टार शोमध्ये राहुल म्हणाला की, १० वर्षांपूर्वी टी-२० संघात स्थान मिळवण्यासाठी मी काहीही करायला तयार होतो. माझ्याकडे कधीही टी-२० खेळाडू म्हणून पाहिलं गेलं नाही, किंवा चांगला व्हाइट-बॉल खेळाडू मानलं गेलं नाही. माझी ओळख ही फक्त कसोटीपुरती मर्यादीत राहिली. त्या चौकटीबाहेर येऊन माझा व्हाइट-बॉल गेम सुधारून इथपर्यंत पोहोचणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे."

प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत, पण...
 
 बदलाच्या प्रवासात मी चुका केल्या, काही गोष्टी अजून चांगल्या करता आल्या असत्या. पण मला याचा अभिमान आहे की प्रत्येक वेळी मैदानात उतरलो तेव्हा मी शंभर टक्के दिलं आणि स्वतःला यशस्वी होण्याची सर्वोत्तम संधी देण्यासाठी पूर्ण तयारी केली.  प्रत्येक वेळी गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाहीत. तुम्हाला ते स्वीकारावं लागतं आणि या प्रवासाचा आनंद घ्यावा लागतो. जिंकणं-हारणं काहीही असो, मी स्वतःला नेहमी संतुलित ठेवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा मला वाटतं की, मी काहीच साध्य केलं नाही, तेव्हा मी माझ्या यशाची आठवण करून घेतो आणि त्यातून मला योग्य दृष्टिकोन मिळतो. अजून माझ्याकडे वेळ आहे, असे म्हणत त्याने येत्या काळात आणखी दमदार कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे म्हटले आहे.
 

Web Title : केएल राहुल ने तोड़ी रूढ़ि, टी20 में शानदार प्रदर्शन से छाए!

Web Summary : केएल राहुल का आक्रामक प्रदर्शन आलोचकों को जवाब है। टी20 में पिछली असफलताओं के बावजूद, अब वे ऑरेंज कैप की दौड़ में सबसे आगे हैं। अपनी यात्रा पर विचार करते हुए, उन्होंने आत्मविश्वास और निरंतर सुधार पर जोर दिया।

Web Title : KL Rahul breaks mold, shines in T20 with stellar performance.

Web Summary : KL Rahul's aggressive batting in IPL 2026 defies critics. Despite past T20 setbacks, he now dominates, leading the Orange Cap race with a high strike rate and reflecting on his journey, emphasizing self-belief and constant improvement.