संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम

दिल्ली कॅपिटल्ससाठी आता प्रत्येक सामना 'करो वा मरो'ची लढत

By सुशांत जाधव | Updated: May 5, 2026 23:23 IST2026-05-05T23:14:07+5:302026-05-05T23:23:21+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 DC vs CSK Sanju Samson And Kartik Sharma Masterclass Guides Chennai Super Kings To Big Win Against Delhi Capitals | संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम

संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम

दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवरील संथ खेळपट्टीवर संजू सॅमसन आणि युवा बॅटर कार्तिक शर्माच्या दमदार खेळीच्या जोरावर  चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला एकतर्फी पराभूत केले. दिल्लीच्या संघाने दिलेल्या १५६ धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सनं ८ विकेट्स आणि १५ चेंडू राखून विजय नोंदवला. या विजयासह चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने आपल्या खात्यात १२ गुण जमा करत प्लेऑफ्सची आपली दावेदारी आणखी मजबूत केली आहे. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी समीकरण आणखी आव्हानात्मक झाले आहे. आता दिल्ली कॅपिटल्सच्या संघासाठी उर्वरित प्रत्येक सामना 'करो वा मरो'ची लढत असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

समीर रिझवी आणि ट्रिस्टन स्टब्सनं राखली दिल्ली कॅपिटल्सची लाज 

दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय फसवा ठरला. पथुम निसंका १९ (१५), लोकेश राहुल १२ (१३), नितीश राणा १५ (१३) आणि करुण नायर १३ (१३) या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. आपला निर्णय सार्थ ठरवण्यासाठी अक्षर पटेललाही बॅटिंगमध्ये धमक दाखवता आली नाही. संघ अडचणीत असताना ट्रिस्टन स्टब्स ३८ (३१) आणि समीर रिझवीनं शेवटपर्यंत मैदानात थांबतून २४ चेंडूत केलेल्या ४० धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने निर्धारित २० षटकात १५५ धावा केल्या. पण याचा बचाव करताना दिल्लीच्या गोलंदाजांना कमाल दाखवता आली नाही. 

चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"

जिथं दिल्लीकर फलंदाजांनी नांगी टाकली तिथं संजू सॅमसन याने आपल्या फलंदाजीतील क्लास दाखवला. कर्णधार ऋतुराज गायकवाड अवघ्या ६ धावा करून परतल्यावर उर्विल पटेलच्या रुपात चेन्नई सुपर किंग्सला दुसरा धक्का बसला. तो ९ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. पण त्यानंतर संजू सॅमसन आणि युवा बॅटर कार्तिक शर्मा जोडी जमली. संजूनं ५२ चेंडूत ७ चौकार आणि ६ षटकारांसह ८७ धावांची नाबाद खेळी केली. कार्तिक शर्मानं ३१ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजय निश्चित केला. कार्तिक शर्मानं सलग दुसऱ्या सामन्यात नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली.  हा युवा चेहरा संघासाठी ट्रम्प कार्ड ठरताना दिसत आहे. 

Web Title : संजू का धमाका, शर्मा चमके; CSK ने DC को हराया, प्लेऑफ्स की राह आसान!

Web Summary : संजू के शानदार 87* और शर्मा के 41* रनों की बदौलत CSK ने DC को हराया और प्लेऑफ में जगह बनाने की उम्मीदें मजबूत कीं। स्टब्स के 38 रनों के बावजूद DC की बल्लेबाजी लड़खड़ाई। CSK के गेंदबाजों ने DC को 155 पर रोक दिया, जिससे जीत आसान हो गई।

Web Title : Samson's Blazing Knock, Sharma Shines; CSK Dominates DC, Playoffs Beckon!

Web Summary : Riding on Samson's explosive 87* and Sharma's 41*, CSK defeated DC, strengthening their playoff chances. DC's batting faltered, despite Stubbs' 38. CSK's bowlers restricted DC to 155, paving the way for a comfortable victory.