Next

दाऊदच्या भावानं रचला खतरनाक कट | Delhi Police bust Pakistan-Run Terror Module | Arrest 6 Terrorists

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 01:31 PM2021-09-15T13:31:47+5:302021-09-15T13:32:48+5:30

महाराष्ट्र पाकिस्तानच्या टार्गेटवर आहे का? महाराष्ट्रात दहशतवादी हल्ले नेमके कुठे होणार होते? असे प्रश्न पडणारा प्रकार घडलाय... कारण, पाकमधून खतरनाक हल्ल्यांचं प्रशिक्षण घेतलेल्या सहा अतिरेक्यांना बेड्या ठोकण्यात यश मिळालंय... महाराष्ट्रासह भारतात सणासुदीच्या काळात दहशतवादी हल्ले करण्यासाठी आलेल्या सहा खरतनाक अतिरेक्यांना अटक करण्यात आलीय. त्यातील दोघांना पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयनं प्रशिक्षण दिल्याचे उघड झालंय. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केलाय. दाऊद इब्राहीमच्या साथीदारांना हाताशी धरून ‘आयएसआय’ने दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील शहरांमध्ये सणासुदीच्या काळात हल्ले करण्याचा कट आखला होता.