Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...

IPL मध्ये असा पराक्रम करणारा वैभव सूर्यवशी ठरला पहिला फलंदाज

By सुशांत जाधव | Updated: April 29, 2026 00:04 IST2026-04-29T00:02:08+5:302026-04-29T00:04:00+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Vaibhav Suryavanshi Missed World Record In T20 Fastest To 100 T20 Sixes Kieron Pollard PBKS vs RR IPL 2026 | Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...

Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यवंशीनं पुन्हा एकदा आपल्या बॅटमधील उत्तुंग फटकेबाजीसह मैफील लुटली. या सामन्यात फक्त १६ चेंडूंचा सामना करताना त्याने अर्शदीप सिंगसह लॉकी फर्ग्युसन आणि मार्को यान्सेन या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या गोलदांची धुलाई केली. त्याने ३ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४३ धावा काढल्या. एक सिंगल धाव वगळता त्याने सर्व धावा या चौकार षटकारांच्या मदतीनेच काढल्या. पंजाबविरुद्ध त्याच्या भात्यातून आणखी एक मोठी खेळी पाहायला मिळेल, असे वाटत असताना मोठा फटका मारण्याच्या नादात तो झेलबाद होऊन परतला. त्याचे अर्धशतक हुकलेच पण नवा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी एक षटकारही कमी पडला. पण त्यातही त्याने एक मोठा डाव साधला आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

विश्वविक्रमाला एक षटकार कमी पडला, पण...

वैभव सूर्यवंशीला पंजाब विरुद्धच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूंत १०० षटकार ठोकणारा फलंदाज होण्याची संधी होती. आतापर्यंत त्याने टी-२० क्रिकेटमध्ये ५११ चेंडू खेळत ९९ षटकार लगावले आहेत. म्हणजेच, तो फक्त एका षटकाराने हा मोठा विक्रम करण्यापासून वंचित राहिला. सध्याच्या घडीला हा विक्रम वेस्ट इंडिजचा माजी दिग्गज केरॉन पोलार्डच्या नावावर आहे. त्याने ८४३ चेंडूंमध्ये १०० षटकार पूर्ण करण्याचा पराक्रम केला आहे. वैभव सूर्यवंशीची मोठी संधी हुकली. पण अजूनही तो हा विक्रम अगदी सहज आपल्या नावे करू शकतो. यासाठी आता त्याला फक्त एक सामना पुरेसा आहे. 

PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ

अशी कामगिरी करणारा IPL मधील पहिला फलंदाज

पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मोठा विश्वविक्रम लांबणीवर पडला असला तरी वैभव सूर्यवंशीनं ४३ धावांच्या खेळीसह IPL मध्ये नवा इतिहास रचला आहे. एका हंगामात २३० पेक्षा अधिकच्या स्ट्राईक रेटसह ४०० पेक्षा अधिक धावा करणारा IPL इतिहासातील तो पहिला फलंदाज ठरला आहे. यंदाच्या हंगामात त्याने ९ सामन्यांतील ९ डावांत ४०० धावा केल्या असून त्याचा स्ट्राईक रेट तब्बल २३८.१० इतका आहे. यामध्ये त्याने ३४ चौकार आणि ३७ षटकारांची आतषबाजी केली आहे.
 

Web Title : वैभव सूर्यवंशी की विस्फोटक पारी: रिकॉर्ड चूका, आईपीएल इतिहास रचा!

Web Summary : वैभव सूर्यवंशी ने 16 गेंदों में 43 रन की तूफानी पारी से टी20 रिकॉर्ड लगभग तोड़ दिया। सबसे तेज़ 100 छक्के लगाने से चूकने के बावजूद, वह इस सीज़न में 230+ स्ट्राइक रेट से 400+ रन बनाने वाले पहले आईपीएल खिलाड़ी बने।

Web Title : Vaibhav Suryavanshi's explosive innings: Missed record, created IPL history!

Web Summary : Vaibhav Suryavanshi's blistering 43 off 16 balls nearly broke a T20 record. Despite missing the fastest 100 sixes, he became the first IPL player to score 400+ runs at a 230+ strike rate this season.