नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 00:19 IST2026-04-29T00:17:47+5:302026-04-29T00:19:22+5:30

दयाशंकर तिवारी यांच्या मोबाईलवरून काही लोकांना सकाळच्या सुमारास व्हॉट्सअपवर, मी अडचणीत असून ५७ हजार रुपये तातडीने पाठवा, सायंकाळी पैसे परत करतो असे मॅसेजेस आले.

Nagpur BJP city president Tiwari's mobile hacked, accused demand money from people | नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी

नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी


नागपूर : भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांचा मोबाईल फोन अज्ञात गुन्हेगारांनी हॅक केला. तिवारी यांच्या सोशल माध्यमांवरील खात्यांवरून त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट व फ्रेंड लिस्टमधील लोकांना आरोपींकडून पैशांची मागणी करण्यात आली. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

दयाशंकर तिवारी यांच्या मोबाईलवरून काही लोकांना सकाळच्या सुमारास व्हॉट्सअपवर, मी अडचणीत असून ५७ हजार रुपये तातडीने पाठवा, सायंकाळी पैसे परत करतो असे मॅसेजेस आले. लोकांनी तिवारी यांना दुसऱ्या क्रमांकावर फोन करून विचारणा केल्यावर फोन हॅक झाल्याची बाब स्पष्ट झाली. तिवारी यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे. सोबतच सोशल माध्यमांवर त्यांनी याबाबत पोस्टदेखील केली. मी पैसे मागण्याबाबतचे कुठलेही मॅसेजेस किंवा फोन केलेला नाही. त्यामुळे अशा प्रकारचा मॅसेज आल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवू नका व पैसे पाठवू नका असे आवाहन तिवारी यांनी केले आहे.

 

Web Title : नागपुर भाजपा अध्यक्ष तिवारी का फोन हैक; संपर्कों से पैसे मांगे गए।

Web Summary : नागपुर भाजपा शहर अध्यक्ष का फोन हैक। धोखेबाजों ने सोशल मीडिया के माध्यम से संपर्कों से पैसे मांगे, आपातकाल का दावा किया। तिवारी ने संदिग्ध संदेशों को अनदेखा करने का आग्रह किया।

Web Title : Nagpur BJP Chief's Phone Hacked; Money Demands Made to Contacts.

Web Summary : Nagpur BJP city president's phone hacked. Imposters requested money from contacts via social media, claiming an emergency. Tiwari urged people to ignore suspicious messages.