भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 00:03 IST2026-04-29T00:02:55+5:302026-04-29T00:03:51+5:30

संघटनात्मक कार्याच्या हातोटीमुळे मिळाली उमेदवारी...

BJP's shock tactics, opportunity for cooperative expert Sanjay Bhende instead of established candidates from Vidarbha | भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख

भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख


नागपूर : विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणूकीसाठी नागपुरातून भाजपकडून प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपने धक्कातंत्र वापरत चर्चेत असलेल्या नावांऐवजी ‘मायक्रो प्लॅनर’ अशी ओळख असलेल्या व सहकार क्षेत्रातील दांडगा अनुभव असलेल्या भेंडे यांना संधी दिली आहे. राजकीय वर्तुळात शांत, संयमी व मितभाषी अशी त्यांची ओळख आहे. मागील काही निवडणूकींतील त्यांच्या पडद्यामागील कामगिरीमुळेच त्यांना उमेदवारी मिळाल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली आहे.

महालात जन्मलेले भेंडे हे लहानपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. संघ मुख्यालय असलेल्या मोहीते भागाचे ते कार्यवाहदेखील होते. सुरुवातीपासूनच समाजकारणाशी जुळल्या गेलेले भेंडे हे न्यू इंग्लिश कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापकदेखील होते. सहकार क्षेत्रात त्यांनी प्रवेश केल्यावर कामाचा आवाका वाढला व २७ वर्षांहून अधिक काळापासून ते बॅंकिंग क्षेत्राशी जुळले राहिले. नागपूर नागरिक सहकारी बॅंकेचे अध्यक्ष म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आली. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेचे प्रशासकीय मंडळ सदस्य, नवी दिल्लीतील को ऑपरेटिव्ह बॅंक ऑफ इंडियाचे संचालक, महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे सदस्य म्हणूनदेखील कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे.

यादरम्यान भाजपमधीलदेखील अनेक जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात आल्या. महाराष्ट्रभरातील पक्षाच्या कार्यालयांचे व्यवस्थापन करण्यातही महत्त्वाची संघटनात्मक भूमिका बजावली आहे. २०१३ ते २०१५ या कालावधी राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले. २०२४ साली झालेल्या विधानसभा निवडणूकीत बुथ टू बुथ मार्किंगबाबत मायक्रो प्लॅनिंगमध्ये त्यांचा मौलिक वाटा होता. तर नुकत्याच झालेल्या नागपूर महानगरपालिका निवडणूकीदरम्यान निवडणूक प्रमुख म्हणून त्यांच्याकडे धुरा सोपविण्यात आली होती. निवडणूकीची रणनिती आखणे, नियोजन, घटक पक्षांसोबत चर्चा व प्रचार मोहीमेचे व्यवस्थापन याची जबाबदारी भेंडे यांनी पार पाडत पक्षाला एकहाती विजय मिळवून दिला होता.

अखेर संधी मिळाली
मागील काही वर्षांपासून सातत्याने त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळणार अशा चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी इतर उमेदवाराचे नाव समोर यायचे. परंतु भेंडे यांनी संघटनात्मक काम करण्यावर भर कायम ठेवला होता. .यावेळीदेखील डॉ.राजीव पोतदार, संदीप जोशी, शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या नावांची चर्चा होती. मात्र भेंडे यांना त्यांच्या संयमाचे फळ उमेदवारीच्या रुपात मिळाले.

सामाजिक क्षेत्रातदेखील सक्रिय
संजय भेंडे हे केवळ सहकार, बॅंकिंग व राजकारणच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातदेखील अनेक वर्षांपासून सक्रिय आहे. मैत्री परिवार संघटना व पंडित बच्छराज व्यास स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सामाजिक क्षेत्रातदेखील ओळख निर्माण केली.

Web Title : भाजपा का चौंकाने वाला फैसला: संजय भेंडे को मिला विदर्भ MLC टिकट।

Web Summary : भाजपा ने नागपुर MLC के लिए सहकारी विशेषज्ञ संजय भेंडे को नामित करके चौंका दिया। 'माइक्रो प्लानर' के रूप में जाने जाने वाले, उनके संगठनात्मक कौशल और सहकारी क्षेत्र के अनुभव ने उन्हें यह अवसर दिलाया। भेंडे का शांत स्वभाव और पिछले चुनाव कार्य महत्वपूर्ण कारक थे।

Web Title : BJP surprises: Sanjay Bhende gets Vidarbha MLC ticket over established leaders.

Web Summary : BJP nominated co-operative expert Sanjay Bhende for Nagpur MLC, surprising many. Known as a 'micro planner,' his organizational skills and experience in the co-operative sector earned him the opportunity. Bhende's quiet demeanor and past election work were key factors.