TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 10:36 IST2026-04-28T10:34:00+5:302026-04-28T10:36:38+5:30

TCS Nashik Case And Nida Khan : टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि.२७) नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली.

Shocking revelation in TCS conversion case; Victim's name changed, Malegaon connection with Malaysia | TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन

TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन

टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रयत्न प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी (दि.२७) नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. न्या. के. जी. जोशी यांनी दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर अटकपूर्व व अंतरिम जामीन अर्जावरील निकालासाठी २ मे ही तारीख निश्चित केली असून, तोपर्यंत निदा खानच्या अटकेवर टांगती तलवार आहे. दरम्यान, या गंभीर गुन्ह्यात मलेशियाशी संबंधित काही आर्थिक संबंध असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असल्याचा अत्यंत धक्कादायक खुलासा सरकारी वकील अजय मिसर यांनी केला, तसेच जे जबाव या प्रकरणात प्राप्त झाले आहेत, त्यात धर्मांतराचा प्रयत्न करण्यासाठी मालेगाव कनेक्शनही आहे, ते कनेक्शन मिसर यांनी न्यायालयासमोर नमूद केले.

पीडित महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न करून तिचे नाव बदलण्यात आले होते. तिला मलेशियामध्ये 'इम्रान' नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठविण्याचा मोठा कट आरोपींनी रचला होता. पीडितेचे धर्मांतर करण्याच्या उद्देशाने आरोपी निदा खान हिने तिच्या मोबाइलमध्ये तिच्या धर्माशी संबंधित अॅप्लिकेशन डाउनलोड करून दिले, तसेच यूट्यूब, इन्स्टाग्राम लिंक व रील्सद्वारे धार्मिक शिक्षण पाठविले, असे अॅड. अजय मिसर यांनी न्यायालयाला सांगितले. 

"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती

हिजाब परिधान करणे, रोजा पाळणे

पीडित मुलीला हिजाब परिधान करणे, रोजा पाळणे यासंदर्भात प्रशिक्षण देण्यात आले, असेही तपासातून समोर आले असल्याचे त्यांनी नमूद केले. पीडितांनी दिलेल्या जबाबांमध्ये मालेगाव येथील काही व्यक्ती व दुव्यांचा उल्लेख असून, त्याची माहिती न्यायालयासमोर सादर करण्यात आली. या सर्व बाबींचा सखोल तपास अद्याप बाकी असून, आरोपीकडील मोबाइल जप्त करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे आरोपीला अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी त्यांनी केली.

"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा

निदा खान गर्भवती

सुनावणीदरम्यान एसआयटीचे तपास अधिकारी संदीप मिटके उपस्थित होते. दोन्ही बाजूंचा सविस्तर युक्तिवाद ऐकून न्यायालयाने कोणतेही अंतरिम संरक्षण न देता निकाल २ मे रोजी देण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील घडामोडींवर सर्वाचे लक्ष लागले आहे. यावेळी बचाव पक्षाच्या वकिलांनी महाराष्ट्रात स्वतंत्र धर्मातरविरोधी कायदा लागू नसल्याचा मुद्दा मांडत, कोणत्या कायद्यांतर्गत हा गुन्हा बसतो यावर प्रश्न उपस्थित केला. निदा खान ही गर्भवती असून, तिला अटकपूर्व जामीन मंजूर करावा. एकाच कालावधी व ठिकाणी घडलेल्या घटनांसाठी अनेक एफआयआर दाखल करण्याची गरज नसून एकच गुन्हा दाखल व्हायला हवा, असा युक्तिवाद त्यांनी केला.

७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा

सरकारी वकील म्हणून आता अॅड. मिसर यांच्याकडे जबाबदारी

टीसीएसप्रकरणी सरकारी अभियोक्ता म्हणून किरण बेंडभर या पहिल्या सुनावणीपासून एसआयटी, तसेच सरकार पक्षाची बाजू मांडत होत्या; परंतु आता ज्येष्ठ विधिज्ञ अजय मिसर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सोमवारी पहिल्यांदाच या प्रकरणात बाजू मांडली. या प्रकरणातील दुसरा संशयित दानिश शेख याने दाखल केलेला जामिनासाठीचा अर्ज न्यायालयाने बाद ठरविला. दानिश सध्या कोठडीत आहे.

Web Title : टीसीएस धर्मांतरण मामला: पीड़िता का नाम बदला, मलेशिया, मालेगांव कनेक्शन सामने आया

Web Summary : टीसीएस धर्मांतरण मामले में मलेशिया कनेक्शन सामने आया। सुनवाई के दौरान पीड़िता का नाम बदला गया और मालेगांव लिंक सामने आया। आरोपी निदा खान की जमानत याचिका पर सुनवाई 2 मई को है। उस पर पीड़िता को धार्मिक सामग्री भेजने और उसे काम के लिए मलेशिया भेजने की योजना बनाने का आरोप है।

Web Title : TCS Conversion Case: Victim's Name Changed, Malaysia, Malegaon Connection Surfaces

Web Summary : In the TCS conversion case, a Malaysia connection emerged. The victim's name was changed, and a Malegaon link surfaced during the hearing. The accused, Nida Khan's, bail hearing is on May 2nd. She allegedly sent religious content to the victim and planned to send her to Malaysia for work.