दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
By संतोष कनमुसे | Updated: April 28, 2026 10:42 IST2026-04-28T10:18:53+5:302026-04-28T10:42:30+5:30
दाऊद इब्राहिमला मोठा झटका बसला आहे. त्याच्या जवळचा कुख्यात ड्रग माफिया सलीम डोला याला तुर्की येथून प्रत्यार्पित करण्यात आले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याने त्याला अटक केली असून, सध्या दिल्लीत त्याची चौकशी सुरू आहे.

दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा अत्यंत विश्वासू आणि कुख्यात ड्रग्ज तस्करसलीम डोला याला अखेर तुर्कस्तानमधून भारतात आणण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी एका विशेष विमानाने त्याला दिल्लीच्या टेक्निकल विमानतळावर आणले. इस्तंबूलमध्ये तुर्की सुरक्षा यंत्रणांनी केलेल्या अटकेनंतर, भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे त्याचे प्रत्यार्पण शक्य झाले आहे.
सलीम डोला हा फक्त दाऊदचा साथीदारच नाही, तर जागतिक सिंथेटिक ड्रग नेटवर्कमधील एक मुख्य चेहरा आहे. तो दुबई आणि तुर्कीमध्ये बसून भारतात अमली पदार्थांचा पुरवठा करण्याचे मोठे सिंडिकेट चालवत होता. या अवैध व्यापाराची वार्षिक उलाढाल ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतीय तरुणांना ड्रग्जच्या जाळ्यात ओढण्यासाठी त्याने देशाच्या विविध भागांत प्रयोगशाळा आणि कारखाने उभारले होते.
A close aide of Dawood Ibrahim, Salim Dola, has been brought to India. He was deported to India and landed at a technical airport in Delhi earlier today. The deportation was carried out after a coordinated operation by intelligence agencies in collaboration with international…
— ANI (@ANI) April 28, 2026
यंत्रणांचे यश - भारतीय गुप्तचर यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मदतीने ही गुप्त मोहीम राबवली.
चौकशीचा घेरा- सध्या दिल्लीत डोलाची सखोल चौकशी सुरू असून, त्यानंतर त्याला मुंबई पोलीस किंवा NCB च्या ताब्यात दिले जाईल.
कुटुंबावर आधीच कारवाई: ऑक्टोबर २०२५ मध्ये त्याचा सहकारी सोहेल शेख, तर नोव्हेंबर २०२५ मध्ये त्याचा मुलगा ताहिर डोला आणि कुटुंबातील ४ सदस्यांना दुबईतून भारतात आणून अटक करण्यात आली होती.
बक्षीस आणि नोटीस: डोलाच्या विरोधात आंतरराष्ट्रीय 'रेड कॉर्नर नोटीस' जारी करण्यात आली होती आणि एनसीबीने त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते.
५,००० कोटी रुपयांचे अमली पदार्थांचे साम्राज्यडोलाचे संबंध थेट दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कशी जोडलेले आहेत. तो भारतात अमली पदार्थांच्या पुरवठ्याचे एक मोठे जाळे चालवत होता. जागतिक सिंथेटिक ड्रग नेटवर्कमध्ये सलीम डोलाचे नाव प्रमुख मानले जाते. त्याचे ड्रग सिंडिकेट दरवर्षी ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा अवैध व्यापार करत होते.