कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असून विदर्भ व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस झाला़ कोकण,गोव्यात तुरळक जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे़. ...
पावसामुळे कोल्हापुरातील शाळांना मंगळवार आणि बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. पंचगंगा, कृष्णा, कोयना, वारणा अशा चारही नद्यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...
पार्ले ता कऱ्हाड येथील बनवडी आणि पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक बनला आहे. पुलाचे खालच्या बाजूने सिमेंट काँंक्रीट निघून गेले आहे तर स्टिल उघडे पडले आहे. त्यामुळे पुल कमकुवत बनला आहे. ...
वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलाच्या परिणामाने सिंधुदुर्ग जिल्हा तापाने फणफणल्याचे जिल्हा सामान्य रुग्णालय, आरोग्य केंद्र तथा खासगी दवाखान्यांत होत असलेल्या रुग्णांच्या गर्दीवरून दिसत आहे. सद्यस्थितीत शेकडो रुग्ण सर्दी, ताप, खोकल्याने बेजार झाले आहेत. ...
कृष्णा नदीत मित्रांसमवेत पोहण्यासाठी गेलेला युवक वाहून गेल्याची खळबळजनक घटना शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली. संबंधित युवकाचा पोलीस आणि ग्रामस्थांनी शोध घेतला मात्र, रात्री उशिरापर्यंत युवकाचा थांगपत्ता लागला नाही. ...
सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे नदी ओढ्यांना महापूर आला आहे. सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवार, दि. ५ आॅगस्ट रोजी सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच उच्च माध्यमिक महाविद्यालयां ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा हाहाकार सुरू आहे. बहुतांश धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा, कोयनासह अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. काही ठिकाणचे पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. ...