Ayodhya Ram Mandir : राम मंदिरउत्तर प्रदेशातील अयोध्येत भव्य राम मंदिराच्या उभारणीचे काम जोरात सुरू आहे. २२ जानेवारी २०२४ ला राम मंदिरात रामललाच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्री राम तळमजल्यावरील गर्भगृहात विराजमान होतील. हे मंदिर तीन मजली असून प्रत्येक मजल्याची उंची २०-२० फूट असणार आहे. एकूण २.७ एकर जागेवर बांधले जात आहे. तसेच, मंदिरात एकूण ३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील. याशिवाय, मंदिरात पाच मंडप असणार आहेत. Read More
अयोध्येतील राममंदिराची सहा डिसेंबरनंतर पंतप्रधानांच्या हस्ते पायाभरणी केली जाईल, असे राममंदिर न्यास कमिटीचे अध्यक्ष स्वामी रामविलास वेदांती यांनी गुरुवारी येथे सांगितले. ...
अयोध्या प्रश्नावर दोन्ही बाजूच्या लोकांनी एकत्र येऊन न्यायालयाबाहेर चर्चा करून सामंजस्याने तोडगा काढावा, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने केली असली, तरी असा तोडगा निघणं जरा कठीणच दिसतंय. ...
अयोध्येमध्ये लवकरात लवकर राममंदिर बांधण्याची प्रतिज्ञा उत्तर प्रदेशमधील होमगार्डचे महासंचालक जनरल सूर्यकुमार शुक्ला यांनी घेतल्याने वादंग निर्माण झाले आहेत. शुक्ला आॅगस्टमध्ये निवृत्त होणार आहेत. ...
अयोध्या विवादाच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान या खटल्याची सुनावणी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत टाळण्याच्या कपिल सिब्बल यांनी न्यायालयाला केलेल्या विनंतीशी सुन्नी वक्फ बोर्डाने सहमती व्यक्त केली आहे. ...