जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 44 जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला. देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण 78 वाहने होती आणि त्यातून एकूण 2,547 जवान प्रवास करत होते. जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर 350 किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. Read More
भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त मोठी कारवाई करत पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हल्ल्याच्या सर्व सुत्रधारांचा खात्मा केल्यानंतर आता भारतीय हवाई दलाने जैश ए मोहम्मदला मोठा दणका दिला. ...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताने जोरदार हवाईहल्ला करत अतिरेक्यांचा खात्मा केला. या माध्यमातून भारतीय जवानांनी 'पुलवामा' चा बदला घेतला आहे. या कारवाईबाबत जवानांचे अभिनंदन कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी करण्यात आले. फटाक्यांची आतषबाजी करीत ' भा ...
भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी पाकव्याप्त काश्मीरमधील मुजफ्फराबादच्या बालकोट भागात 1000 किलोचे बॉम्ब फेकले. यात जवळपास 200 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...
जेव्हा अशा कारवाईची संधी मिळते, तेव्हा स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं, अशी भावना दोन वर्षांपूर्वी कारगिल विजय दिवासानिमित्त दिलेल्या मुलाखतीत बी. एस. धनोआ यांनी व्यक्त केली होती. ...
डिसेंबर, १९९९ मध्ये इंडियन एअरलाइन्सचे आय-८१४ हे विमान काठमांडूहून नवी दिल्लीला जात असताना पळवून नेण्यात आले आणि तालिबानच्या ताब्यात असलेल्या कंदाहार येथे उतरविण्यात आले. ...