भाजपा नेते प्रमोद सावंत यांनी गोव्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे साखळी मतदारसंघातून दोनवेळा निवडून आले आहेत. प्रमोद सावंत हे भाजपा पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. कोठंबी पाळी येथील असलेले सावंत हे पर्रीकर यांच्या पाठिंब्यामुळे सरकारी नोकरी सोडून राजकारणात आले. सावंत हे मार्च 2017 पासून गोवा विधानसभेचे सभापती असून, त्यांना मुख्यमंत्री बनण्याचा मान मिळाला आहे. तसेच पेशाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. Read More
केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी गोव्यात आलेवेळी म्हादयी प्रश्नावर न बोलता या प्रश्नावर मुख्यमंत्री बोलतील असे म्हटले आहे. त्या पार्श्वभूमीवर सरदेसाई यांनी आता मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसात भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली. ...
भाजपच्या "सेवाव्रताचा" कार्यक्रम खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी असल्याचे सिद्ध करुन दाखवावे अशी मागणी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे. ...