"मोदींच्या वाढदिवशी कोरोनाची खासगी रुग्णालये ताब्यात घ्या किंवा रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करा"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2020 01:07 PM2020-09-17T13:07:45+5:302020-09-17T13:11:55+5:30

भाजपच्या "सेवाव्रताचा" कार्यक्रम खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी असल्याचे सिद्ध करुन दाखवावे अशी मागणी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

goa congress girish chodankar slams modi government over corona virus | "मोदींच्या वाढदिवशी कोरोनाची खासगी रुग्णालये ताब्यात घ्या किंवा रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करा"

"मोदींच्या वाढदिवशी कोरोनाची खासगी रुग्णालये ताब्यात घ्या किंवा रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करा"

googlenewsNext

मडगाव - गोव्यातील भाजपा सरकारने त्वरित कोविड रुग्णांना उपचार देणारी खासगी इस्पितळे ताब्यात घ्यावी किंवा खासगी इस्पितळात उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या बिलांवर अनुदान जाहीर करावे. प्रधानमंत्री मोदींच्या वाढदिनी ही घोषणा करुन मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी भाजपच्या "सेवाव्रताचा" कार्यक्रम खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी असल्याचे सिद्ध करुन दाखवावे अशी मागणी काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केली आहे.

आजाराचा बाजार करण्याचे धोरण राबवलेल्या गोव्यातील भाजपाने केवळ कमिशन खाण्यासाठी संपुर्ण देशाच्या तुलनेत गोव्यात सर्वात जास्त दर ठरवून दिले आहेत असा गंभीर आरोप चोडणकर यांनी केला आहे. कोविड महामारीच्या संकटकाळात सामान्य लोकांप्रती असंवेदनशीलता दाखवणाऱ्या भाजपा सरकारने खासगी इस्पितळांसाठी लोकांना न परवडणारे दर मान्य करुन आपले भांडवलदारांवरील प्रेम परत एकदा उघड केल्याचा दावा त्यांनी केला आहे. 

गोव्यात कोविड महामारीचा उद्रेक होण्यास सरकारच पूर्णपणे जबाबदार आहे. सरकारने जाणुनबूजुन दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ कोविड इस्पितळ म्हणून जाहीर करण्यास वेळ लावला. त्यामुळेच आज गोव्यातील सर्व इस्पितळे भरलेली आहेत. कोविड रुग्णांवर जमिनीवर झोपण्याची पाळी आली असताना, सरकारातील भ्रष्ट आरोग्यमंत्री अजुनही सदर इस्पितळातील रिकामे असलेल्या दोन मजल्यांचा वापर करण्यास टाळाटाळ करीत आहे. यात विश्वजीत राणेंचा  व्यक्तिगत स्वार्थ असल्याचे स्पष्ट होते असे चोडणकर म्हणाले. 

सरकारने मागील सहा महिन्यात कोविड रुग्णांच्यी उपचारासाठी कसलीच तयारी केली नाही. कोविड महामारीचा राष्ट्रीय लाॅकडाऊन जाहिर केल्यानंतर ही सरकार "टाळी बजाव थाळी बजाव" उत्सव साजरे करण्यात व्यस्त होते. कोविड रुग्णांना आता  सर्व मदत करणे ही सरकारची जबाबदारी व कर्तव्य आहे. गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या वाढदिनी सरकारने खासगी इस्पितळे ताब्यात घेण्याची किंवा रुग्णांना अनुदान देण्याची घोषणा करणे गरजेचे आहे. आज देशातील वाढत्या कोविड रुग्णांच्या संख्येसाठी तेच जबाबदार आहेत हे मुख्यमंत्र्यानी लक्षात ठेवावे.

फसलेला लाॅकडाऊन व कोविड महामारीचे अव्यवस्थापन यामुळेच देशातील प्रत्येक नागरीक आज हवालदिल झाला आहे. गोव्यात मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी हेकेखोरपणे काॅंग्रेस पक्षाने केलेल्या महत्वाच्या सुचना अमलात आणल्या नाहीत. राज्यात सामुहीक चाचणी करावी, मांगोर येथे कोरनाचे रुग्ण सापडल्यानंतर संपुर्ण वास्को शहर लाॅकडाऊन करण्यास केलेली टाळाटाळ व दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ कोविड सेंटर जाहिर करण्यास लावलेला वेळ यामुळेच आज गोवा कोविड डेस्टिनेशन झाला आहे असे चोडणकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

"भाभीजी के पापड' खाऊन कोरोना बरा होतो का?", संजय राऊतांचा भाजपाला सणसणीत टोला

Video - "या' गर्दीत कोरोना होत नाही असा सरकारचा समज आहे का?', मनसे नेत्याचा सवाल

CoronaVirus News : गेल्या 24 तासांत देशात तब्बल 97,894 नवे रुग्ण, रुग्णसंख्येने ओलांडला 51 लाखांचा टप्पा 

Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींना राहुल गांधी, कंगना राणौतने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

भाजपा मंत्र्यांनी सरकारी गाडीवर लावला उलटा 'तिरंगा' अन्...

Web Title: goa congress girish chodankar slams modi government over corona virus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.