डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या पंधराशे गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठपैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद, तर साताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवने सात ...
बेमुदत कामबंद आंदोलन सुरू असल्याने विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा १५ दिवस पुढे ढकला, अशी मागणी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) मंगळवारी केली. विविध मागण्यांसाठी कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील प्राध्यापकांनी सुटाच्या नेतृत्वाख ...
गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी कापड व्यापाऱ्यांस आठ ते दहा जणांनी वाटेत अडवून बेदम मारहाण केली. यावेळी त्यांच्या अंगावरील तीन तोळ्यांची चेन हिसकावून घेतली. ...
महानगरपालिकेच्या दुधाळी येथील शूटिंग रेंजला आमदार सतेज पाटील, महापौर शोभा बोंद्रे यांनी भेट देऊन पाहणी केली. जिल्हा नियोजन समितीमधून मिळालेल्या निधीतून बांधण्यात आलेल्या अद्ययावत शूटिंग रेंजची त्यांनी फिरुन पाहणी केली. क्रीडा संकुल ज्या शूटिंग रायफल ...
कौटुंबिक वादातून दारूच्या नशेत चेष्टेवारी स्वत:सह मुलीला विष घ्यायला सांगून बेशुद्ध पडलेल्या वडिलांचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सखाराम शंकर पाटील (वय ४५, रा. पिसात्री, ता. पन्हाळा) असे त्यांचे नाव आहे. त्यांची मुलगी सरिता (१९) ...
महावितरणच्या पुणे परिमंडळच्या ‘प्रेमात सगळंच माफ’ व कोल्हापूर परिमंडळच्या ‘कार्टी नं. १’ या नाटकातून एकापेक्षा एक सरस संवादफेक व उत्कृष्ट अदाकारी करून नाट्य कलावंतांनी कोल्हापूरकर रसिकांची मने जिंकली. ...
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) दूध पावडर दुबईला निर्यात करण्यात आली. देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर चांगले असल्याने संघाने दूध पावडर दुबईला निर्यात करण्याचा निर्णय घेतला. पावडरचे चार कंटेनर दुबईला रवाना ...