जलद बुद्धिबळ स्पर्धा : कोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 05:09 PM2018-10-09T17:09:30+5:302018-10-09T17:14:31+5:30

डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या पंधराशे गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठपैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद, तर साताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले.

Fast Chess Competition: The Soham Bhaav Bazar Ajinkya of Kolhapur | जलद बुद्धिबळ स्पर्धा : कोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्य

 डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या १५०० गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेतील विजेत्यांसोबत मान्यवर उपस्थित होते.

ठळक मुद्देजलद बुद्धिबळ स्पर्धा : कोल्हापूरचा सोहम खासबारदार अजिंक्यसाताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवला उपविजेतेपदावर समाधान

कोल्हापूर : डिपार्टमेंट आॅफ टेक्नॉलॉजी चेस क्लब व कोल्हापूर चेस अकॅडमीतर्फे घेण्यात आलेल्या पंधराशे गुणांकनाखालील खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धेत सातवा मानांकित कोल्हापूरच्या सोहम खासबारदारने आठपैकी आठ गुण मिळवून अजिंक्यपद, तर साताऱ्याच्या ज्योतिरादित्य जाधवने सात गुण मिळवून उपविजेतेपद पटकाविले.

शिवाजी विद्यापीठ तंत्रज्ञान विभागात झालेल्या या स्पर्धेत खुल्या गटात सोहम खासबारदार (कोल्हापूर), ज्योतिरादित्य जाधव (सातारा), प्रणव पाटील (कोल्हापूर), अभिषेक पाटील, अनिकेत बापट (सातारा), श्रुती गुरव (कोल्हापूर), मयांक च्युलेट (बेळगाव), अनिकेत रेडीज (रत्नागिरी), आयुष महाजन (कोल्हापूर), सिद्धेश यादव (सांगली).

बिगरमानांकित गटात सनमित शहा (सांगली), आकाश शेवते (वाई), नीलेश पुजारी (बेळगाव), शुभम कांबळे (इचलकरंजी), सुरेश भोसले (सातारा), कुणाल सपकाळ (सातारा), तीर्थलिंग शेफाली (रायगड), रेहान महात (सांगली), राहुल शहा (बेळगाव), संकेत नाटेकर (सांगली).

गुणांकन १००० ते ११५० गटात यश पंढरपुरे (सांगली, तुषार घुणके (कारदगा), सम्मेद पाटील (इचलकरंजी), समृद्धी कुलकर्णी (कोल्हापूर), श्रावणी बोरकर (कोल्हापूर), गुणांकन ११५१ ते १३०० गटात शर्विल पाटील, वरद आठल्ये (कोल्हापूर), संकेत महाडेश्वर (सिंधुदुर्ग), ईशा कोळी (सातारा), सारंग पाटील (कोल्हापूर) यांचा समावेश आहे.

उत्कृष्ट बुद्धिबळपटू बी. एस. नाईक (कोल्हापूर), दिलीप कुलकर्णी (सांगली), पूर्वा सप्रे, रजनी झांबरे (कोल्हापूर), मयूरी सावळकर, तृप्ती प्रभू, अथर्व चव्हाण, स्वप्निल गुडघे, रितेश केसरे, सय्यद अमीन, प्रज्ज्वल जोशी, हृषिकेश तिबिले, कौस्तुभ गोते, पार्थ मकोटे. सर्वांत लहान बुद्धिबळपटू म्हणून मिहीर शहा, मनवा देशपांडे यांचा गौरव करण्यात आला.

स्पर्धेचा बक्षीस समारंभ प्रवीण शहा, अजितसिंह काटकर यांच्या हस्ते झाला. यावेळी भरत पाटोळे, बी. एस. नाईक, दयानंद साजन्नावर, महिपाल मिरजे, भरत चौगुले, मनीष मारुलकर, उत्कर्ष लोमटे, प्रीतम घोडके, पुष्कर जाधव, ऋतुराज भोकरे, आदी उपस्थित होते.


 

 

Web Title: Fast Chess Competition: The Soham Bhaav Bazar Ajinkya of Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.