केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 07:40 AM2024-05-19T07:40:16+5:302024-05-19T07:41:17+5:30

चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविताना आपण दाखल केलेल्या पोलिस तक्रारीचीही दखल घेण्यात यावी, असे बिभवने अटक होण्यापूर्वी दिल्ली पोलिसांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. अटकेनंतर बिभव कुमारने न्यायालयात अग्रीम जामिनासाठी याचिका दाखल केली.

Kejriwal's ex-PA Bibhav Kumar finally arrested; Swati came out easily, 'AAP' released the video | केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 

केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 

नवी दिल्ली : ‘आप’च्या खासदार स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानाहून त्यांचा माजी स्वीय सहायक बिभव कुमार याला अटक केली. दरम्यान, मारहाणीच्या कथित घटनेनंतर केजरीवाल यांच्या निवासस्थानातून मालीवाल सहजपणे बाहेर पडत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज आज ‘आप’ने जारी केले.

चौकशीत सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविताना आपण दाखल केलेल्या पोलिस तक्रारीचीही दखल घेण्यात यावी, असे बिभवने अटक होण्यापूर्वी दिल्ली पोलिसांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये म्हटले आहे. अटकेनंतर बिभव कुमारने न्यायालयात अग्रीम जामिनासाठी याचिका दाखल केली. आपल्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती माध्यमांद्वारे मिळाली असून तक्रारीची प्रत मिळावी म्हणून न्यायालयात अर्ज केला. दरम्यान, बिभव कुमारनेही मालीवाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी अवैध प्रवेश करणे, धमकी देणे, शिवीगाळ, जोरजोराने ओरडल्याचे आरोप करत त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

मालीवालांना चार जखमा
मालीवाल यांची एम्समध्ये वैद्यकीय चाचणी केली. न्यायवैद्यकीय अहवालात मालीवाल यांचा उजवा गाल व डाव्या पायासह चार ठिकाणी जखमा असल्याचे नमूद आहे.
ब्लॅकमेलिंगचा आरोप
विरोधी नेत्यांना ब्लॅकमेल करणे ही भाजपची कार्यपद्धती आहे. काही महिन्यांपासून स्वाती भाजप नेत्यांच्या संपर्कात होत्या. त्यांना ब्लॅकमेल करून भाजपने केजरीवालांविरुद्ध कटकारस्थानाचा चेहरा बनवला, असा आरोप आतिशी यांनी केला.

नव्या व्हिडीओमध्ये सारे काही सामान्य : आतिशी
कथित मारहाणीच्या घटनेनंतर १३ मे रोजी केजरीवाल यांच्या बंगल्यातून मालीवाल सहजपणे चालत बाहेर पडत असल्याचा व्हिडिओ ‘आप’ने जारी केला. या नव्या व्हिडीओने मालीवाल यांच्या दाव्यांचा पर्दाफाश झाला आहे. कथित मारहाणीनंतर त्यांचे कपडे फाटल्याचे, जखमांमुळे वेदना झाल्याचे, लंगडत चालत असल्याचे या व्हिडीओत दिसत नाही, असे आतिशी म्हणाल्या.

आम्हा सर्वांनाच तुरुंगात टाका : केजरीवाल 
आम आदमी पार्टीचे सर्व बडे नेते, खासदार आणि आमदारांसह रविवारी बारा वाजता भाजपच्या मुख्यालयात येत आहेत. आम्हा सर्वांनाच सरसकट तुरुंगात टाका,
असे आव्हान शनिवारी पंतप्रधानांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले.
मालीवाल प्रकरणावर प्रथमच भाष्य करताना केंद्रातील सरकार आणि भाजप आम आदमी पार्टीच्या हात धुऊन मागे लागले असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला. 
राघव चड्ढा लंडनहून परतले, केजरीवाल यांची भेट : आपचे राज्यसभा खासदार राघव चड्ढा हे तीन महिने लंडनमध्ये राहिल्यानंतर शनिवारी भारतात परतले आणि त्यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. 
 

Web Title: Kejriwal's ex-PA Bibhav Kumar finally arrested; Swati came out easily, 'AAP' released the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.