मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 08:20 AM2024-05-19T08:20:17+5:302024-05-19T08:20:51+5:30

महायुतीला शून्य जागा मिळतील, असे म्हणणार नाही, त्यांनाही काही जागा मिळतील, पण मविआ अधिकाधिक जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी व्यक्त केला.

Mavia will win 46 seats in the state; Congress president Mallikarjun Kharge expressed his belief | मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास


मुंबई : महाविकास आघाडी राज्यात ४८ पैकी ४६ जागा जिंकणार आहे. महायुतीला शून्य जागा मिळतील, असे म्हणणार नाही, त्यांनाही काही जागा मिळतील, पण मविआ अधिकाधिक जागा जिंकेल, असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी व्यक्त केला.

मविआच्या पत्रकार परिषदेत खरगे म्हणाले, की भाजपकडून तपास यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. विरोधी पक्षांत फूट पाडली जात आहे. सत्याची बाजू मांडणाऱ्या पक्षांकडून पक्ष व चिन्ह काढून भाजपचे समर्थन करणाऱ्यांकडे साेपवण्यात येत आहे. पण यावेळी जनता फसणार नाही. त्यामुळे संविधान व लोकशाही वाचवण्यासाठी देशात आमचे सरकार येणार हे नक्की.

जनतेत भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न
- काँग्रेस सत्तेत आल्यास अयोध्येच्या राम मंदिरावर बुलडोझर चालवतील हा मोदींचा आरोप जनतेमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.
- बुलडोझर संस्कृती भाजपची आहे काँग्रेसची नाही आणि तसे काही करणार नाही, असेही खरगे म्हणाले.
 

Web Title: Mavia will win 46 seats in the state; Congress president Mallikarjun Kharge expressed his belief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.