देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
महापालिकेत विकासाच्या केवळ बाता केल्या जातात; प्रत्यक्षात बोंब आहे. दोन वर्षात एकही विकासकाम झालेले नाही. नादारीच्या अवस्थेला आलेल्या महापालिकेची आता ग्रामपंचायतच करा म्हणजे कोणालाच जास्तीचे मानधन देण्याची गरज राहणार नाही. ...
ब्रह्मपुरी नगर परिषद निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये काँग्रेस-रिपब्लिकन पक्ष आघाडीने नगराध्यक्षपदासह तब्बल ११ जागा जिंकून बहुमतासह नगर परिषदेवर झेंडा फडकविला. विशेष म्हणजे भाजपा या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. ...
वाशिम : जिल्हा घरेलु असंघटीत महिला कामगारांच्या मागण्या प्रलंबित असून, याविरोधात काँग्रेसने आवाज उठविला आहे. प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी घरेलू महिलांसह काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. ...
2019 साली होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्ष भाजपाला जागा दाखवेल, भाजपाला देशाच्या सत्तेतून उखडून टाकेल, अशी गर्जना काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ...