मध्य प्रदेशात निकालापूर्वीच समर्थकांनी लावले कमलनाथ यांच्या अभिनंदनाचे बॅनर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 02:28 PM2018-12-10T14:28:19+5:302018-12-10T14:31:06+5:30

एक्झिट पोलमधून मध्य प्रदेशात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे.

Wait till tomorrow, everything will be clear - Kamal Nath | मध्य प्रदेशात निकालापूर्वीच समर्थकांनी लावले कमलनाथ यांच्या अभिनंदनाचे बॅनर 

मध्य प्रदेशात निकालापूर्वीच समर्थकांनी लावले कमलनाथ यांच्या अभिनंदनाचे बॅनर 

Next
ठळक मुद्देएक्झिट पोलमधून मध्य प्रदेशात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह प्रत्यक्ष निकालापूर्वीच मध्य प्रदेशमधली काँग्रेसच्या विविध गटांनी आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यास सुरुवात कमलनाथ यांच्या समर्थकांनी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कमलनाथ यांचे अभिनंदन करणारे लावले पोस्टर्स

भोपाळ - एक्झिट पोलमधून मध्य प्रदेशात काँग्रेसचे पारडे जड असल्याचे संकेत मिळाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, प्रत्यक्ष निकालापूर्वीच मध्य प्रदेशमधली काँग्रेसच्या विविध गटांनी आपापल्या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून पुढे करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कमलनाथ यांच्या समर्थकांनी प्रदेश कार्यालयाच्या बाहेर कमलनाथ यांचे अभिनंदन करणारे पोस्टर्स लावले आहेत. दुसरीकडे कमलनाथ यांना याबाबत विचारले असता त्यांनी उद्यापर्यंत वाट पाहा, उद्या सर्व चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले. 

आज कमलनाथ हे पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आले असता त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषाबाजी केली. तसेच कमलनाथ यांचे मोठे स्वागतही केले. दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसकडे मुख्यमंत्रिपदासाठी कमलनाथ आणि ज्योतिरादित्य शिंदे असे दोन दावेदार आहेत. तसेच दोघांनीही राज्यात जोरदार प्रचार केला होता. 





 दरम्यान, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाबाबत कमलनाथ यांच्याकडे विचारणा केली असता, उद्यापर्यंत वाट पाहा. उद्या सगळे चित्र स्पष्ट होईल, असे सांगितले.  तसेच राज्यात काँग्रेस पक्ष 140 हून अधिक जागा जिंकून सत्तेवर येईल, असा दावाही त्यांनी केला. 



 

Web Title: Wait till tomorrow, everything will be clear - Kamal Nath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.