देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के एच मुनियप्पा यांच्याशी संबंध असल्यासंबंधी प्रश्न विचारला असता रमेश कुमार यांनी 'मी पुरुषांसोबत झोपत नाही' असं उत्तर दिलं आहे. रमेश कुमार यांच्या विधानाने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला असून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या तिकिटाचा आधी फैसला करा अशी आग्रही मागणी माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीकडे केली आहे. ...
स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले. ...