काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 14:24 IST2026-04-30T14:23:38+5:302026-04-30T14:24:06+5:30

लग्नाच्या वरातीमध्ये वाजणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे पोल्ट्री फार्ममधील १४० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.

What can I say now! The DJ played so loudly at the wedding that 140 chickens died; the owner got angry and... | काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...

AI Generated Image

लग्नकार्यातील डीजेचा दणदणाट अनेकांसाठी मनोरंजनाचा विषय असतो, मात्र उत्तर प्रदेशातील सुल्तानपूरमध्ये याच आवाजाने एका गरीब पोल्ट्री फार्म चालकाचे कंबरडे मोडले आहे. वरातीमध्ये वाजणाऱ्या डीजेच्या अति तीव्र आवाजामुळे तब्बल १४० कोंबड्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बल्दीराय परिसरात घडली आहे. या विचित्र घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आता याप्रकरणी डीजे मालकावर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे.

नेमकं प्रकरण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, दरियापूर गावातील बब्बन विश्वकर्मा यांच्या मुलीचे २५ एप्रिल रोजी लग्न होते. कुडवार येथून आलेल्या या वरातीमध्ये डीजेचा मोठा ताफा होता. ही वरात जेव्हा साबिर अली यांच्या पोल्ट्री फार्मवरून जात होती, तेव्हा डीजेचा आवाज कानठळ्या बसवणारा होता. साबिर अली यांनी वारंवार आवाजाची तीव्रता कमी करण्याची विनंती केली, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत डीजे सुरूच ठेवण्यात आला.

... अन् कोंबड्यांनी सोडले प्राण!

डीजेच्या प्रचंड व्हायब्रेशन आणि आवाजामुळे पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. या आवाजाच्या धक्क्याने आणि दहशतीमुळे कोंबड्या सैरावैरा पळू लागल्या आणि बघता बघता १४० कोंबड्यांनी दम तोडला. "मी विनवणी करत होतो की आवाज कमी करा, पण कुणीही ऐकले नाही. आवाजाच्या कंपनामुळे माझ्या कोंबड्यांचा बळी गेला," असे हतबल झालेल्या साबिर अली यांनी सांगितले.

पोलिसांची मोठी कारवाई

या प्रकरणाची दखल घेत पोलीस उपनिरीक्षक भरत सिंह यांनी स्वतःहून पुढाकार घेतला. सार्वजनिक शांततेचा भंग आणि प्राण्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याबद्दल कुडवार येथील डीजे चालक कवि यादव याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ध्वनी प्रदूषणामुळे खरोखरच कोंबड्यांचा मृत्यू झाला का, याचा वैज्ञानिक तपास आता पोलीस करत आहेत.

Web Title : शादी में डीजे की तेज आवाज से 140 मुर्गियों की मौत; मालिक नाराज़

Web Summary : उत्तर प्रदेश में एक शादी में डीजे के तेज संगीत से एक पोल्ट्री फार्म में 140 मुर्गियों की मौत हो गई। मालिक की आवाज कम करने की गुहार को अनसुना कर दिया गया। पुलिस डीजे की शोर प्रदूषण और पशु क्रूरता के लिए जांच कर रही है।

Web Title : DJ's Loud Music Kills 140 Chickens at Wedding; Owner Angry

Web Summary : Loud DJ music at an Uttar Pradesh wedding allegedly killed 140 chickens on a poultry farm. The owner's pleas to lower the volume were ignored. Police are investigating the DJ for noise pollution and animal cruelty.