देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
स्मृती इराणी यांच्यासाठी जमेची बाब म्हणजे, येथून पराभूत झाल्यानंतर देखील त्यांनी अमेठीत आपला संपर्क कायम ठेवला. तसेच वेळोवेळी काँग्रेसला लक्ष्य केले. ...
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेशाचा सपाटा सुरू असताना पिंपरी-चिंचवड शहरात मात्र भाजपाला जोरदार राजकीय धक्का बसला आहे. ...
अखेर २३ जानेवारी १९७७ रोजी इंदिरा गांधी यांनी निवडणुका घेण्याची घोषणा केली. फेब्रुवारी-मार्चमध्ये निवडणुका झाल्या. त्यांचे निकाल २० मार्च रोजी लागले. काँग्रेसचा दारुण पराभव झाला आणि २५ जून १९७५ रोजी लागू करण्यात आलेली आणीबाणी २१ मार्च १९७७ रोजी उठविण ...
नगर परिषद व महापालिकेत अनेक वर्षे नगरसेवक म्हणून निवडून आलेले उत्तनचे लिओ कोलासो यांनी शहराच्या नियोजन समिती सभापतीपासून अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. मच्छीमारांचे नेते म्हणून ते सक्रिय आहेत. ...
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर आम्ही काँग्रेस पक्षातच आहोत. मी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नाही, मात्र माझ्या जागेवर अचानक रात्रीतून दुसरा जिल्हाध्यक्ष नेमला. ...