देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीन मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया गुणा मतदार संघातून एक लाख मतांनी पराभूत झाले. त्यांना पराभूत करणारे कृष्ण पाल यादव उर्फ केपी कधीकाळी काँग्रेसचे नेते होते. ...
भाजपामधून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अनेक नेत्यांना देखील पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यामध्ये भाजपाचे माजी खासदार आणि काँग्रेसचे बिहारमधील उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांचा समावेश आहे. ...
लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप सोडून काँग्रेसमध्ये दाखल झालेले शत्रुघ्न सिन्हा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिन्हा काँग्रेसच्या तिकीटावर पटना साहिब मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. ...