“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 09:20 IST2026-04-19T09:19:47+5:302026-04-19T09:20:09+5:30

Congress Harshwardhan Sapkal: देशाची निवडणूक संरचना बदलून संविधान, लोकशाही मोडीत काढण्याचे कुटील कारस्थान उघड झाले आहे, अशी टीका करण्यात आली.

congress harshwardhan sapkal replied pm modi over women reservation bill and message to nation | “PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ

“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेससारख्या पक्षांच्या स्वार्थी राजकारणाचा फटका देशातील महिलांना बसला. या साऱ्या घटना २१व्या शतकातील महिला पाहात आहेत आणि त्या योग्यवेळी उत्तर देतील अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात केली. या टीकेला आता काँग्रेसकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.

महिला आरक्षणाच्या आडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणण्याचा प्रयत्न करणा-या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्राला संबोधण्याच्या नावाखाली देशातील जनतेला प्रचारकी थाटातील आपले भाषण ऐकवले. ३० मिनिटांच्या भाषणात मोदीजींनी ५८ वेळा काँग्रेसचे नाव घेतले आणि आपल्या नेहमीच्या सवयीने त्यांनी खोटे दावे केले. महिला आरक्षणाच्या नावाखाली मतदारसंघ पुनर्रचना विधेयक आणून देशाची निवडणूक संरचना बदलून संविधान आणि लोकशाही मोडीत काढण्याचा मोदी सरकारचे कुटील कारस्थान उघड झाले  आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. 

महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे

महिला आरक्षणाच्या नावाखाली संविधान, लोकशाही आणि निवडणूक प्रक्रियेवर घाला घालण्याचा प्रयत्न करून तमाम महिलांची फसवणूक केल्याबद्दल नरेंद्र मोदींनी देशाची जाहीर माफी मागितली पाहिजे. आता लागलीच महिला आरक्षणाची अंमलबजावणी केली पाहिजे. महिला आरक्षणाचा कायदा नारी शक्ती वंदना तर सप्टेंबर २०२३ मध्ये काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांच्या मदतीने मंजूर झालेला आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेसने जनधन-आधार-मोबाईल (JAM) आणि जीएसटीला विरोध केला हा पंतप्रधानांचा दावा म्हणजे त्यांच्या खोटारडेपणाचे उत्तम उदाहरण आहे. २९ सप्टेंबर २०१० रोजी महाराष्ट्रातील नंदुरबार येथून आधारचा शुभारंभ पंतप्रधान  डॉ मनमोहन सिंह व सोनिया गांधी यांनी केला होता.  डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्त्वाखालील काँग्रेस सरकारने जीएसटी पुढे नेला होता; मात्र त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री असणा-या नरेंद्र मोदी यांनी GST ला विरोध केला होता, याची आठवण सपकाळ यांनी करून दिली. 

 

Web Title : पीएम मोदी का संबोधन कांग्रेस पर हमला, झूठ का उत्सव: सपकाल

Web Summary : कांग्रेस ने पीएम मोदी के भाषण की आलोचना करते हुए महिला आरक्षण और कांग्रेस के जेएएम और जीएसटी पर रुख के बारे में तथ्यों को विकृत करने का आरोप लगाया। सपकाल ने महिलाओं को कथित तौर पर गुमराह करने के लिए मोदी से माफी की मांग की।

Web Title : PM Modi's address is Congress bashing, a festival of lies: Sapkal

Web Summary : Congress criticizes PM Modi's speech, accusing him of distorting facts regarding women's reservation and Congress's stance on JAM and GST. Sapkal demands an apology from Modi for allegedly misleading women.