देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसमध्ये सध्या या पराभवावरुन चिंतन करण्याचं काम सुरु आहे. दिल्लीमध्ये काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी काँग्रेसच्या पराभवाची कारणं सांगितली आहेत. ...
राहुल गांधी यांनी राजीनाम्याचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त चुकीचे आहे.काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरू आहे, असे स्पष्टीकरण काँग्रेस नेते रणदीप सूरजेवाला यांनी दिले आहे. ...
भाजपाच्या लाटेने पूर्णपणे वाहून गेलेल्या काँगे्रसला उभारी देण्यासाठी बाहेरून नेतृत्व येणार नाही. येथीलच नव्या नेतृत्वाला संधी द्यावी लागेल, विश्वास टाकावा लागेल. ...
गेल्या वर्षी भाजपला उत्तर प्रदेशातील गोरखपूर, फुलपूर आणि केराना तसेच महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया मतदार संघात झालेल्या पोट निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता. ...