देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
जिल्हा परिषदेत दोन्ही काँग्रेससह शिवसेना एकत्र आल्याने सदस्यांचे संख्याबळ ४० वर गेले असून सत्तेचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. ...
रत्नागिरी जिल्हा काँग्रेसमधील अंतर्गत वाद आणखीनच चिघळला असून, जिल्हा कार्यकारिणी बरखास्तीनंतर नूतन जिल्हाध्यक्ष विजय भोसले यांनी थेट काँग्रेस भुवन येथील कार्यालयाला टाळे ठोकल्याने वादात आणखीन भर पडली आहे. ...
स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी या देशात फोडा आणि राज्य करा हे धोरण राबवले होते तीच परिस्थिती भाजपचे केंद्र सरकार पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. ...
दोन लाख रुपयांवरील कर्जमुक्तीच्या टप्प्यासाठी प्रस्ताव विचाराधीन आहे. तसेच नियमीत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही दिलासा देऊ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. ...
2012 मध्ये सवित्रीबाई भाजपकडून बहराईचमधून विधानसभेवर निवडून आल्या होत्या. त्यानंतर 2014 मध्ये त्यांना लोकसभेचे तिकीट देण्यात आले. त्यातही त्या विजयी झाली होत्या. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ...