देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राजीव सातव 2014 मध्ये हिंगोली मतदार संघातून लोकसभेला निवडून आले होते. मात्र त्यांनी 2019 मध्ये निवडणूक लढवली नाही. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसच्या संघटनावरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ते सध्या गुजरात काँग्रेसचे प्रभारी आहेत. ...
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी अर्थात 14 नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येतो. यावर विरोधी पक्षाने आक्षेप घेतला असून दिल्लीतील निवडुकीच्या पार्श्वभूमीवर तिवारी यांनी हे पत्र मोदींना लिहिल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. ...