देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
देशाचे संविधान आता धोक्यात आले आहे. लोकशाहीची हत्या होत आहे. अनेक संस्था नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. न्यायव्यवस्थेवर दडपण टाकण्यात येत आहे. निवडणूक आयोग, सीबीआय, ईडी, आयकर विभाग दडपणाखाली असल्याचे गेहलोत यांनी नमूद केले. ...
पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात सर्व जागा भरून टाकणारे हे पहिलेच सरकार. ज्या पद्धतीने मुख्यमंत्री कार्यरत आहेत, ते पाहता खातेवाटपानंतर हे मंत्रिमंडळ जोमाने कामाला लागेल आणि राज्याचा सर्वांगीण विकास घडवून आणेल अशी जनतेची अपेक्षा आहे. त्यासाठी नव्या मंत् ...