देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Coronavirus : देशावर कोरोनाचं संकट असताना सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलवर मिळणारा नफा जनतेसाठी खर्च करायला हवा असं म्हणत अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. ...
'कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या जागतीक संकटाच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीने देशाचे नेतृत्व करत आहेत, त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यासंकटातून बाहेर पडण्यासाठी संपूर्ण जग मोदींकडे मोठ्या आशेने पाहत आहे,” असेही नड्डा म्हणाले. ...