काँग्रेसने दिला ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2020 02:30 PM2020-04-06T14:30:54+5:302020-04-06T14:31:00+5:30

वृत्त पत्रविक्रेते हे अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही सरकारने त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही साधन उपलब्ध तर केले नाही.

Congress gives a helping hand to newspaper vendors in Thane | काँग्रेसने दिला ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात

काँग्रेसने दिला ठाण्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांना मदतीचा हात

Next

ठाणे:कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी झालेल्या लाॅकडाउनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील वृत्त पत्रविक्रेत्याना जिल्हा इंटकच्या वतीने मदतीचा हाथ देताना त्यांना सोमवारी जीवनावश्यक वस्तूचे वितरण करण्यात आले.

कोरोना संसर्गाच्या पाश्वभुमिवर सर्व स्तरातून मदतीचा ओघ चालू असताना वृत्त पत्रविक्रेते हे अत्यावश्यक सेवेत मोडत असतानाही सरकारने त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही साधन उपलब्ध तर केले नाही. तसेच त्यांना कोणतीही मदत देऊ केली नाही. दारोदार वर्तमानपत्रे वितरत करायचे असेल तर यांच्याही जिविताचा,त्यांच्या कुटुंबियांचा विचार सरकारने केला पाहिजे होता असे जिल्हा इंटक काँग्रेस अध्यक्ष सचिन शिंदे यांनी सांगितले.या वर्गाला भविष्यात कोणतीही आर्थिक मदत होईल की नाही हाही मोठा प्रश्नच आहे असे त्यांनी बोलताना सांगितले. 

याप्रसंगी ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेते सघटनेचे अध्यक्ष कैलास म्हापदी,महाराष्ट्र प्रदेश इंटकचे उपाध्यक्ष डाॅ.सदिप वंजारी,वृत्त पत्र विक्रेते संघटनेचे सरचिटणीस अजित पाटील आदि मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना कैलास म्हापदी यांनी सांगितले की, वृत्त पत्रविक्रेता हा रोज लोकांना सेवा देतो तो कधी सकाळी येउन जातो व आपली जबाबदारी पार पाडतो पण लोकांच्या लक्षातही राहात नाही असा घटक आहे. या घटकाकडे सरकारने लक्ष दिले नाहीये परंतु इंटक काँग्रेसच्या माध्यमातून जी मदत उपलब्ध झाली त्याबद्दल त्यांनी आयोजकाचे आभार मानले .याप्रसंगी डाॅ.सदिप वंजारी यांनी या वृत्तपत्र व्रिकेत्याना अजूनही मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे आश्वासन दिले.

Web Title: Congress gives a helping hand to newspaper vendors in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.