Coronavirus : 'इंग्रजांनीही अशी करवसुली केली नव्हती', काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 09:05 PM2020-04-06T21:05:40+5:302020-04-06T21:14:09+5:30

Coronavirus : देशावर कोरोनाचं संकट असताना सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलवर मिळणारा नफा जनतेसाठी खर्च करायला हवा असं म्हणत अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

coronavirus in delhi congress blamed bjp for petrol and diesel price SSS | Coronavirus : 'इंग्रजांनीही अशी करवसुली केली नव्हती', काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Coronavirus : 'इंग्रजांनीही अशी करवसुली केली नव्हती', काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Next

नवी दिल्ली - जगातील सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून कोरोना व्हायरसचा वाढता प्रसार रोखण्यासाठी  प्रयत्न करत आहेत. भारतातदेखील कोरोनाला आळा घालण्यासाठी व्यापक प्रयत्न करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन करण्यात आल्याची घोषणा केली. तसेच लोकांना घरातून बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या 4000 वर पोहोचली असून हा आकडा सातत्याने वाढत आहे. याच दरम्यान काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

देशावर कोरोनाचं संकट असताना सरकारने गेल्या कित्येक महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलवर मिळणारा नफा जनतेसाठी खर्च करायला हवा असं म्हणत अभिषेक मनू सिंघवी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. 'आज कच्च्या तेलाची किंमत 23 डॉलर प्रति बॅरलवर पोहचली आहे. गेल्या सहा वर्षांत किंमतीमध्ये झालेली घसरण आणि उत्पादन शुल्क मिळून हिशोब केला तर सरकारला जवळपास 20 लाख करोड रुपयांचा नफा झाला आहे' असं सिंघवी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

'आज पेट्रोलची किंमत 70 रुपयांहून अधिक आणि डिझेलची किंमत 65 रुपयांहून अधिक आहे. ही कोणत्या पद्धतीची करवसुली आहे. इंग्रजांनीही कधी दुष्काळाच्या वेळी अशा प्रकारची करवसुली केली नव्हती' असं म्हणत सिंघवी यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. तसेच ही वेळ पेट्रोल आणि डिझेलवर नफा मिळवण्याची नाही तर तर जनतेसोबत नफ्याचे पैसे वाटण्याची आहे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची आहे असा सल्लाही अभिषेक मनू सिंघवी यांनी सरकारला दिला आहे.

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या 4000 हून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 693 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! लॉकडाऊननंतर सोपा नसणार रेल्वेप्रवास

Coronavirus : बापरे! 'या' देशात रस्त्यावरच पडले मृतदेह, 'हे' आहे कारण

Coronavirus : 'आम्हाला पैशांची समस्या नाही तर...', केजरीवालांनी दिलं गौतम गंभीरला उत्तर

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले देवदूत

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक

Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम

 

Web Title: coronavirus in delhi congress blamed bjp for petrol and diesel price SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.