Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले देवदूत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2020 04:21 PM2020-04-06T16:21:43+5:302020-04-06T16:33:47+5:30

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत.

Coronavirus delhi police helped pregnant woman to reach hospital during lockdown SSS | Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले देवदूत

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी पोलीस ठरले देवदूत

Next

नवी दिल्ली - कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 4000 हून अधिक  झाली आहे. संसर्ग रोखण्यासाठी सर्वतोपरी योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्यानंतर मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली. याचदरम्यान कोरोनाशी लढण्यासाठी पोलीस देखील अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदत करत आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडली आहे.

एका गर्भवती महिलेसाठी पोलीस देवदूत ठरले आहेत. दिल्लीत एका महिलेला प्रसुतीवेदना सुरू झाल्या होत्या. त्यावेळी तिच्या कुटुंबियांनी मदतीसाठी अनेक ठिकाणी फोन केला. रुग्णवाहिकेच्या क्रमांकावर कॉल केल्यानंतर उत्तर मिळालं नाही. शेवटी त्यांनी मदतीसाठी पोलिसांना फोन केला. फोन येताच तातडीने पोलीस महिलेच्या घरी दाखल झाले आणि तिला लवकरात लवकर रुग्णालयात दाखल केलं. महिलेने एका मुलीला जन्म दिला आहे. पोलिसांनी महिलेला वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने महिला आणि बाळ दोघंही सुखरूप आहेत. या घटनेनंतर महिला आणि तिच्या कुटुंबियांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

महिलेच्या पतीने दिलेल्या माहितीनुसार, एक एप्रिल रोजी पत्नीला घरामध्ये प्रसुतीवेदना सुरू झाल्या. तेव्हा रुग्णवाहिकेसाठी सर्व ठिकाणी फोन लावले पण कोणीही फोन उचलला नाही. त्यानंतर दिल्ली महिला पोलिसांना फोन लावला. तेव्हा पोलिसांनी गाडी पाठवली. 'कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. असा अडचणीच्या वेळी दिल्ली पोलीस देवदूत बनून आले. मनापासून त्यांचे आभार मानायचे आहेत. त्यांचं काम खूपच चांगलं आहे. कोणाला वाटत असेल की पोलीस मदत करत नाही तर ते चुकीचं आहे' असं म्हणत महिलेने पोलिसांचे आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : धक्कादायक! दारू मिळाली नाही म्हणून पेंट वॉर्निश प्यायले अन्... 

Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अ‍ॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक

Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम

CoronaVirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधानांच्या भाजपा कार्यकर्त्यांना पाच महत्त्वाच्या सूचना

 

Web Title: Coronavirus delhi police helped pregnant woman to reach hospital during lockdown SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.