देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची मागणी केली आहे. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली ...
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या सल्लागार समितीची पहिली बैठक आज पार पडली. यानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारकडे ही मागणी केली आहे. ...
का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते. त्यानंतर हे रामलाल कोण? आणि त्यांनी नेमके काय केले होते असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झाला आहे. ...
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सद्य परिस्थितीवर लक्ष ठेऊन पक्षाचे धोरण ठरवण्यासाठी काँग्रेसने मोठे पाऊल उचलले आहे. ...