देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
CoronaVirus Marathi News and Live Updates: लॉकडाऊनमुळे अनेकांना काहीच काम नसल्याने त्यांनी आपल्या गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी पायी जाण्याचा पर्याय निवडला आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी एक ट्विट केलं आहे. ...
कोरोनामुळे जगभरात ४२ लाखांपेक्षा जास्त लोक संक्रमित झाले आहेत. पावणे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला असून भारतामध्येही अनेक कुटुंबांनी त्यांचे आप्तजण गमावले आहेत. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढून हा आकडा आता तब्बल 67 हजारांवर गेला असल्याची माहिती मिळत आहे. याच दरम्यान काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाच्या बहाण्याने श्रमिकांचे शोषण नको असं म्हटलं आहे. ...
आपल्या गावी जाण्यासाठी हजारो मजूर पायी चालत निघाले होते तर काही जण मिळेल त्या मार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करत होते. हे विदारक चित्र पाहून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या मजुरांना मुळगावी पाठवण्याचा खर्च काँग्रेस पक्ष करेल असे जाहीर केले ...