भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 07:42 PM2020-05-12T19:42:23+5:302020-05-12T19:48:18+5:30

पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

Youth Congress lodges complaint against BJP national spokesperson at police station pda | भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात युवक काँग्रेसकडून पोलीस ठाण्यात तक्रार

Next
ठळक मुद्दे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता सांबित पात्रा यांच्याविरोधात युवक काँग्रेसकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकाराचा युवक काँग्रेस तीव्र निषेध करत असून याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण : दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्याबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचे सांगत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांविरोधात महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यावरून पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता सांबित पात्रा यांच्याविरोधात युवक काँग्रेसकडून ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. पात्रा यांनी काल रात्री आपल्या ट्विटर अकाऊंटवर कोरोना वायरसबाबत एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यातून दिवंगत पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, राजीव गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी आणि बदनामी करण्यात आल्याचे सरचिटणीस दत्त यांनी सांगितले. तसेच, आजच्या घडीला संपूर्ण देश कोरोनासारख्या गंभीर संकटातून जात असून केंद्र सरकार त्याचा सामना करण्यात अपयशी ठरल्याचे सांगत आपले अपयश झाकण्यासाठी भाजपचे नेते अशाप्रकारे दिशाभूल करत असल्याचा आरोपही दत्त यांनी यावेळी केला. दरम्यान, या संपूर्ण प्रकाराचा युवक काँग्रेस तीव्र निषेध करत असून याविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

'मैं जीजा जी बोल रहा हूं, खाते में पैसे भेज रहा हूं', ओळखीचे असल्याचं सांगून ठग ओढतायेत जाळ्यात

 

धक्कादायक! लॉकडाऊनला कंटाळून इंजिनीयरची आत्महत्या

 

VIDEO: घरी सोडण्याची मागणी करणाऱ्या मजुरांना पोलीस अधिकाऱ्याची लाथेनं मारहाण

 

Web Title: Youth Congress lodges complaint against BJP national spokesperson at police station pda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.