दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 09:31 AM2020-05-12T09:31:02+5:302020-05-12T09:42:48+5:30

धार्मिक भावना दुखावणं आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Sambit Patra FIR for tweets against Jawaharlal Nehru and Rajiv Gandhi vrd | दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

दोन माजी पंतप्रधानांविरोधात ट्विटरवर आक्षेपार्ह लिहिल्यानं भाजपाच्या संबित पात्रांविरोधात गुन्हा दाखल

Next
ठळक मुद्देभाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात छत्तीसगडमधल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पूर्णचंद पाधी यांच्या तक्रारीवरून रायपूरच्या सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सोशल मीडियावर देशाचे दोन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांचे फोटो अपलोड करून वादग्रस्त गोष्टी लिहिल्या असल्याचा आरोप संबित पात्रा यांच्यावर करण्यात आला आहे.

नवी दिल्लीः भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांच्याविरोधात छत्तीसगडमधल्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष पूर्णचंद पाधी यांच्या तक्रारीवरून रायपूरच्या सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सोशल मीडियावर देशाचे दोन माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांचे फोटो अपलोड करून वादग्रस्त गोष्टी लिहिल्या असल्याचा आरोप संबित पात्रा यांच्यावर करण्यात आला आहे. रायपूरचे पोलीस अधीक्षक आरिफ शेख यांनी सांगितले की, सोमवारी सायंकाळी पात्रांविरोधात पूर्णचंद पाधी नावाच्या व्यक्तीने सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून धार्मिक भावना दुखावणं आणि दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या आरोपात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

पाधी हे छत्तीसगड युवा कॉंग्रेसचे प्रमुख आहेत आणि त्यांनी 10 मे रोजी पात्रा यांनी केलेल्या ट्विटवर तक्रार दाखल केली. पाधी यांनी असा दावा केला आहे की, काश्मीर प्रकरण, 1948च्या शीखविरोधी दंगली आणि बोफोर्स घोटाळ्यासंदर्भात पात्रा यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि राजीव गांधी यांच्यावर खोटे आरोप केले आहेत.

देश कोरोनाच्या संकटात सापडला असताना सोशल मीडियावर अशा गोष्टी लिहिणे केवळ विविध धार्मिक समुदायाला चिथावणी देणारेच नाही, तर शांततेत अडथळा आणणारे असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.  संबित पात्रा यांच्याविरोधात कलम 153 ए (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा इ. च्या आधारे वेगवेगळ्या गटांमधील वैर वाढवणारे), 505 (2) (सार्वजनिक छळ केल्याचे विधान) आणि 298 कलमांतर्गंत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

लॉकडाऊननंतर इंधन दरवाढीचा भडका उडणार, पेट्रोल-डिझेल महागणार?; 'हे' आहे कारण

भारतीय जवानांशी सिक्कीममध्ये भिडल्यानंतर चीननं दिली अशी प्रतिक्रिया

लॉकडाऊन वाढवणं अर्थव्यवस्थेसाठी आत्मघातकी ठरेल- आनंद महिंद्रा

CoronaVirus News : चिनी हॅकर्सकडून कोरोनाच्या संशोधनासंबंधी माहिती चोरण्याचा प्रयत्न, अमेरिकेचा गंभीर आरोप

Web Title: Sambit Patra FIR for tweets against Jawaharlal Nehru and Rajiv Gandhi vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.