देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं. भाजपाचे नेते टी राजा सिंह यांच्या फेसबुक वॉलवर अनेक भडकाऊ विधाने हटवली जात नव्हती. ...
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून सध्या राजकारणही तापलं आहे. सुशांतच्या आत्महत्येच्या दृष्टीने तपास सुरू असल्याचं सीबआयने म्हटलं. यावरून सचिन सावंत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. ...
प्रकरणे भल्या-बुऱ्या पद्धतीने हाताळण्याचा ‘सीबीआय’चा स्वत:चा एक इतिहास आहे. त्यांच्याकडून काही वेळा गुन्हेगार जाळ्यातून सुटले असतील किंवा राजकीय दबावामुळे तपासाला विलंबही झाला असेल. ...
"पश्चिमेकडे इराणने अब्जावधी रुपयांच्या रेल्वेमार्गाचे काम भारताकडून काढून घेत चीनला दिले. यावरून मित्र राष्ट्रांसोबत योग्य धोरण राबविण्यात परराष्ट्रमंत्री अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होते." ...
आठवलेंनी विविध विषयांवर आणि दलितांवरील अत्याचारावर आपली भूमिका मांडली. ''नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला जेवढ्या मोठ्या संख्येनं लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तो केवळ ब्राह्मणांच्या मतांवर शक्य नाही ...