अखेर फेसबुकचा भाजपा आमदाराला दणका; वादग्रस्त पोस्ट प्रकरणी सर्व अकाऊंटवर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2020 01:31 PM2020-09-03T13:31:48+5:302020-09-03T13:34:02+5:30

वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं. भाजपाचे नेते टी राजा सिंह यांच्या फेसबुक वॉलवर अनेक भडकाऊ विधाने हटवली जात नव्हती.

Facebook, Instagram ban BJP politician Raja Singh over hate speech | अखेर फेसबुकचा भाजपा आमदाराला दणका; वादग्रस्त पोस्ट प्रकरणी सर्व अकाऊंटवर बंदी

अखेर फेसबुकचा भाजपा आमदाराला दणका; वादग्रस्त पोस्ट प्रकरणी सर्व अकाऊंटवर बंदी

Next
ठळक मुद्देवॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतंया बातमीचा हवाला देत कॉंग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला होता.फेसबुकची धोरणे भारत सरकारला पाठिंबा देतात असा आरोप केला जात होता.

नवी दिल्ली – देशात विरोधी पक्षाकडून फेसबुकवर प्रक्षोभक भाषणांना प्रोत्साहन देत असल्याचा आरोप केला जात होता. या दरम्यान फेसबुकनेभाजपा नेते टी राजा सिंह यांच्यावर हिंसा आणि द्वेषाला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्ट केल्याप्रकरणी कारवाई केली आहे. फेसबुकने टी राजा सिंह यांच्यावर फेसबुकच्या नियमांचे उल्लंघन केल्याने फेसबुक, इन्स्टाग्राम या अकाऊंटवर बंदी आणली आहे.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या बातमीत फेसबुक भाजपाच्या धोरणांचं समर्थन करत असल्याचं म्हटलं होतं. भाजपाचे नेते टी राजा सिंह यांच्या फेसबुक वॉलवर अनेक भडकाऊ विधाने हटवली जात नव्हती. या बातमीचा हवाला देत कॉंग्रेससह देशातील विरोधी पक्षांनी भाजपावर हल्लाबोल केला होता. फेसबुकच्या प्रवक्त्याने ईमेल पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही आमच्या धोरणाचे उल्लंघन केल्याबद्दल राजा सिंह यांना फेसबुकवर बंदी घातली आहे. आमचे धोरण फेसबुकद्वारे आमच्या व्यासपीठावर हिंसाचार, द्वेषबुद्धीस उत्तेजन देणे किंवा द्वेष पसरवणे याला प्रतिबंधित करते. संभाव्य उल्लंघन करणार्‍यांचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया व्यापक असून या प्रक्रियेवर काम करीत असताना आम्ही राजा सिंह यांचे अकाऊंट फेसबुकवरून काढून टाकले आहे,असं निवेदनात म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात असं म्हटलं होतं की, फेसबुकची धोरणे भारत सरकारला पाठिंबा देतात, त्यानंतर भारताच्या विरोधी पक्षांनी फेसबुक आणि सरकारचं साटेलोटे असल्याचा आरोप केला होता. भारत हा फेसबुकसाठी सर्वात मोठे बाजार आहे, त्याचे भारतात ३० कोटी युजर्स आहेत. या रिपोर्टमध्ये असा आरोप करण्यात आला होता की, फेसबुकने भाजपाचे आमदार राजा सिंह यांच्या द्वेष पसरवणाऱ्या पोस्टकडे दुर्लक्ष केले. तेव्हापासून सत्ताधारी भाजप आणि कॉंग्रेस सोशल मीडिया दिग्गज कंपनीच्या कथित पक्षपातीपणाबद्दल वक्तव्य करीत आहेत.

वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्ट आल्यानंतर बुधवारी संसदीय समितीने फेसबुक प्रतिनिधींना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर केल्याचा आरोप करत आपली बाजू मांडण्यास सांगितले. त्याचबरोबर मंगळवारी माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनीही फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांना पत्र लिहून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील कर्मचार्‍यांवर निवडणुकीत लोकांना मदत केल्याचा आरोप केला आहे.

काय आहे प्रकरण?

वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन वृत्तपत्रातील लेखामधून फेसबूक भाजपाच्या नेत्यांच्या द्वेषपूर्वक विधानांकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी भारतातील फेसबुक व्हॉट्स अ‍ॅपवर भाजपाचे नियंत्रण असल्याचा आरोप केला होता. यावर आमचा मंच हा खुला, पारदर्शक आणि पक्षपात विरहित आहे, फेसबुक कुठलाही पक्ष आणि विचारसरणीचे समर्थन करत नाही. या प्लॅटफॉर्मवर लोक आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्र आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये आमच्यावर आपले धोरण लागू करण्यामध्ये पक्षपात केल्याचा आरोप झाला आहे. आम्ही या आरोपाकडे गांभीर्याने पाहत आहोत, तसेच आम्ही द्वेष आणि कट्टरता यांचा निषेध करतो असं फेसबुकनं म्हटलं होतं.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

"फक्त रणबीर अन् रणवीर कशाला, आदित्य ठाकरे यांचीही ड्रग्सची टेस्ट करा"

अ‍ॅम्ब्युलन्सची वाट बघतच अनेकांनी जीव गमावला; आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा

"सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये"

हुकूमशहा किम जोंग उननं व्हाईट हाऊसच्या सेक्रेटरीला डोळा मारला, त्यावर डोनाल्ड टम्प म्हणाले...

iPhone साठी चाहत्याने २० वेळा केलं अभिनेत्याला ट्विट; सोनू सूदनंही दिला मजेशीर रिप्लाय

Web Title: Facebook, Instagram ban BJP politician Raja Singh over hate speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.