भाजपा सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग', काँग्रेस नेत्याचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 06:46 PM2020-09-02T18:46:03+5:302020-09-02T18:59:57+5:30

"पश्चिमेकडे इराणने अब्जावधी रुपयांच्या रेल्वेमार्गाचे काम भारताकडून काढून घेत चीनला दिले. यावरून मित्र राष्ट्रांसोबत योग्य धोरण राबविण्यात परराष्ट्रमंत्री अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होते."

The BJP government is a 'class' of 'failed' students, criticism of the Congress leader anant gadgil | भाजपा सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग', काँग्रेस नेत्याचा टोला

भाजपा सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग', काँग्रेस नेत्याचा टोला

Next
ठळक मुद्देसंघाच्या 'वर्गात' वाढलेल्यांनी निदान या परिक्षांची तरी 'नीट' तयारी करावी अशी खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी  केली आहे.

मुंबई : स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदा देशाची विकासवाढ २४ टक्क्यांनी घसरली आहे. एकीकडे सर्वात अपयशी अर्थमंत्री, असे मेसेज सोशल मीडियावर फिरू लागले असतानाही दुसरीकडे अशा गंभीर व धक्कादायक बाबीवर काही प्रसारमाध्यमे जाणीवपूर्वक गप्प आहेत. अर्थव्यवस्था सावरायची प्राथमिक जबाबदारी अर्थमंत्र्यांची असल्यामुळे या परीक्षेत अर्थमंत्री 'नापास' झाल्याचे सिद्ध झाले आहे. संघाच्या 'वर्गात' वाढलेल्यांनी निदान या परिक्षांची तरी 'नीट' तयारी करावी, अशी उपरोधिक टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अनंत गाडगीळ यांनी केली आहे.

भाजपा सरकारचा समाचार घेताना गाडगीळ पुढे म्हणाले, भारताचा आत्तापर्यंत मित्र राहिलेले उत्तरेकडील नेपाळ राष्ट्र हळूहळू चीनकडे सरकत आहे, पूर्वेकडे भुतान व बांगलादेशाला चीन चुचकारु लागला आहे, दक्षिणेकडे श्रीलंकेत चिनी नौदलाचा तळ उभारला जात आहे, पश्चिमेकडे इराणने अब्जावधी रुपयांच्या रेल्वेमार्गाचे काम भारताकडून काढून घेत चीनला दिले. यावरून मित्र राष्ट्रांसोबत योग्य धोरण राबविण्यात परराष्ट्रमंत्री अयशस्वी ठरल्याचे स्पष्ट होते.                   

हेरगिरी करताना अमेरिकेत पकडलेल्या अॅलन हो या चिनी हेराला ज्या ‘बँक ऑफ चायना’ मधील एका गुप्त खात्यातून पैसे पूरविल्याचा अहवाल एफबीआयने दिला त्याच बँकेला मुंबईतील बीकेसीमध्ये कार्यालय उघडण्यास परवानगी देणे यात केंद्रीय गृह खात्याचा बेजबाबदारपणा दिसून येतो.

सिंगापूर, न्यूझीलंड, व्हिएतनामपासून दुबईपर्यंत अनेक राष्ट्रांनी जानेवारीतच आपले विमानतळ बंद केले असताना ट्रम्प यांच्या गुजरातमधील निवडणूक मेळाव्यासाठी  मार्चअखेर पर्यंत भारताने विमानतळ उघडे ठेवले. १  जानेवारी ते १५ मार्च या काळात १० लाख प्रवासी मुंबई विमानतळावर उतरले असता केवळ १९ टक्के प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात आली होती, ती सुद्धा  पूर्वेकडून आलेल्यांची. आता तर कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसाला ८० हजारांवर पोहोचली आहे. राज्यांशी योग्य समन्वय न साधल्याचे हे दुष्परिणाम आहेत. हवाई वाहतूकमंत्री व आरोग्यमंत्री दोघेही निष्भ्रम ठरले  आहेत.

जीडीपी घसरणीत उच्चांक, कोरोनाबाधित रुग्णसंख्येत उच्चांक, थोडक्यात अर्थ, आरोग्य, संरक्षण, परराष्ट्र व्यवहार, गृह अशा सर्व आघाड्यांवर अपयशी ठरणारे  केंद्रातील भाजपा सरकार म्हणजे 'नापास' विद्यार्थ्यांचा 'वर्ग' झाला आहे. संघाच्या 'वर्गात' वाढलेल्यांनी निदान या परिक्षांची तरी 'नीट' तयारी करावी अशी खरमरीत टीका अनंत गाडगीळ यांनी  केली आहे.

आणखी बातम्या...

- पीएम केअर्स फंडमध्ये पहिल्या 5 दिवसांत 3,076 कोटी; बाकीचा हिशोब मार्चनंतर...   

कौतुकास्पद! सोनालीच्या प्रशिक्षणाची जबाबदारी रोहित पवारांनी स्वीकारली    

- तरुणांना भाषण नको, नोकऱ्या पाहिजेत; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

- भाजपात प्रवेश करणार होता हिस्ट्रीशीटर, पोलिसांना पाहताच ठोकली धूम

- चारू सिन्हा यांची सीआरपीएफ श्रीनगर सेक्टरच्या महानिरीक्षकपदी नियुक्ती    

- 'या' कंपनीकडून Permanent Work From Homeची सुविधा, ७५ टक्के कर्मचारी करणार घरून काम

- "राहुल गांधींनी 6 महिन्यांपूर्वी दिला होता इशारा", जीडीपीवरून प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा    

- 'लाल डोळे कधी दिसणार?', चिनी सैनिकांच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा नरेंद्र मोदींवर निशाणा     

Web Title: The BJP government is a 'class' of 'failed' students, criticism of the Congress leader anant gadgil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.