देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Karnataka Election Commission: राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसोबतच कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणुकीत फेरफार झाल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर कर्नाटक निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना महत्त्वपूर्ण सूचना दिली आहे. ...
Harshwardhan Sapkal News: मुंबईमध्ये कबुतरखान्यावरून सुरू असलेल्या वादामागे भाजपा युती सरकारच असून, राज्यातील ज्वलंत प्रश्नावरून जनतेचं प्रश्न दुसरीकडे वळवण्यासाठी या वादाला सरकार या वादाला खतपाणी घालत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्ध ...