रायगड जिल्हा पशुवैद्यकीय दवाखान्याची पुरती दुरवस्था झाली आहे. सोयी-सुविधांची वानवा, औषधे नसल्यातच जमा, इमारतीची पडझड, परिसरात उगवलेले जंगल-झुडपे अशा या पशूंच्या दवाखान्यामध्ये पशूही येण्यास धजावणार नाहीत. ...
कर्जत उपजिल्हा रुग्णालयामध्ये रुग्णांना अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात प्रशासनास अपयश आले आहे. रुग्णालयामध्ये बेडशीटही नसल्याचे निदर्शनास आले असून या गलथान कारभाराविषयी लोकप्रतिनिधींनी प्रशासनास धारेवर धरून कारवाईची मागणी केली आहे. ...
महाड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी सावित्री खाडीत ओवळे येथे सोडले जात आहे. नदीपात्राला प्रदूषणाचा विळखा वाढू लागला असून अशीच स्थिती राहिली तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. ...
भिवपुरी रेल्वे स्थानकामध्ये कर्जतच्या बाजूला पादचारी पूल बांधण्याची मागणी प्रवाशांनी केली होती. पूल नसल्याने डिसकळ परिसरातील प्रवाशांना रूळ ओलांडून यावे लागत होते. ...
रोहा-माणगाव एसटी बस कोलाड रस्त्यावरून जात असताना एका दुचाकीला कट मारल्याचा गैरसमज करून फिल्मी स्टाइलने भर रस्त्यात एसटीसमोर दुचाकी आडवी घालून एसटीमधला जॅक काढून चालकाला मारण्याचा प्रयत्न केल्याची पोलिसांत करण्यात आली आहे. ...
किल्ले रायगडचे संवर्धन हे एक आव्हानात्मक काम असून, भारतात अशा प्रकारे संवर्धनाचे काम प्रथमच होत असल्याची माहिती भारतीय पुरातत्व विभागाचे प्रादेशिक संचालक एम. नंबिराजन यांनी दिली आहे. ...
अलिकडच्या १५ ते २० वर्षांत या समुद्र गरुडांची संख्या दिवसेंदिवस कमी हाेत असल्याने पर्यावरण व पक्षी अभ्यासकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र त्याच वेळी रायगडच्या सागरी किनारपट्टीत या समुद्र गरुडांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...