काय सांगता? लॉकडाऊनच्या २१ दिवसांत २५ फूट खोल विहीरच खोदली

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2020 03:51 PM2020-04-22T15:51:43+5:302020-04-22T16:17:17+5:30

लॉकडाऊनच्या काळात घरात बसून काय करावं असा प्रश्न सर्वांनाच पडलाय, वेळ जात नाही मग काय करायचं.महाराष्ट्रातील एका जोडप्यानं चक्क विहिरच खोदली आहे

गजानन पकमोडे आणि त्यांची बायको पुष्पा यांनी लॉकडाऊनच्या २१ दिवसात चक्क २५ फूट खोल विहिरच खोदली.

या जोडप्याला विहिर खोदण्याच्या कामात त्यांना दोन लहान मुलांनीही मदत केली, सध्या या विहीरीला पाणी लागल्याने जे कुटुंब अतिशय आनंदी आहे

वाशिम जिल्ह्यातील करखेडा या गावातील कष्टाळू कुटुंबाची ही लॉकडाऊन कथाच न्यारी आहे.

लॉकडाऊनमुळे देशात सर्वच बंद आहे, त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची राजधानी, गर्दीचं सर्वात मोठं शहरदेखील निर्मनुष्य बनलंय.

लॉकडाऊन असल्याने आणि कोरोनाचं संकट असल्याने नागरिक घरातच बसून आहे, टीव्ही, वाचन आणि इंटरनेटच्या माध्यमातून आपला दिवस घालवत आहेत

एकीकडे दिवस कसा काढायचा अशी चिंता लोकं करत असताना, वाशिमच्या या जोडप्यानं आदर्शवत काम करुन वेळेचा सदुपयोग करुन दाखवलाय