अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 06:16 IST2026-05-19T06:15:45+5:302026-05-19T06:16:28+5:30

US San Diego Mosque Shooting: अमेरिकेतील सॅन डिएगो येथील मशिदीत अंदाधुंद गोळीबार. २ अल्पवयीन हल्लेखोरांसह ५ ठार. पोलिसांनी व्यक्त केला हेट क्राईमचा संशय. वाचा सविस्तर.

US San Diego Mosque Shooting: Indiscriminate shooting at mosque in America; 5 people including two minor suspects dead, police declare 'hate crime' | अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित

अमेरिकेत मशिदीत अंधाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित

सॅन डिएगो (अमेरिका): अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन डिएगो शहरातून एक मोठी घटना समोर आली आहे. येथील एका मशिदीमध्ये झालेल्या अंदाधुंद गोळीबारात दोन अल्पवयीन संशयित हल्लेखोरांसह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. या क्रूर घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, प्राथमिक तपासानंतर स्थानिक पोलिसांनी हा 'हेट क्राईम' (द्वेषातून केलेला गुन्हा) असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, सॅन डिएगो येथील मशिदीत नागरिक नमाज पठन करत असताना अचानक गोळीबाराचा आवाज झाला. दोन संशयित हल्लेखोर, जे अल्पवयीन असल्याचे सांगितले जात आहे, त्यांनी मशिदीत घुसून अंधाधुंद गोळीबार सुरू केला. या गोळीबारात तीन नागरिकांचा मृत्यू झाला. नंतर दोन्ही संशयित हल्लेखोरांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेतल्या आहेत. 

परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे मोठे पथक आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. मशिदीचा संपूर्ण परिसर सुरक्षित करण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमेरिकेतील मुस्लिम संघटनांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून, धार्मिक स्थळांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

तपास सुरू
हा हल्ला पूर्वनियोजित होता का आणि हल्लेखोरांचा मुख्य हेतू काय होता, याचा तपास अमेरिकन गुप्तहेर यंत्रणा आणि स्थानिक पोलीस करत आहेत. 'हेट क्राईम'चा अँगल समोर आल्यामुळे या प्रकरणाचा तपास अतिशय संवेदनशीलतेने केला जात आहे.

Web Title : अमेरिका: मस्जिद में गोलीबारी, दो संदिग्धों समेत पांच की मौत; घृणा अपराध घोषित

Web Summary : सैन डिएगो की एक मस्जिद में गोलीबारी में दो नाबालिग संदिग्धों सहित पांच लोग मारे गए। नमाज के दौरान हुई इस घटना को पुलिस घृणा अपराध मानकर जांच कर रही है, जिससे धार्मिक स्थलों की सुरक्षा पर सवाल उठ रहे हैं।

Web Title : US Mosque Shooting: Five Dead, Including Two Suspects; Hate Crime

Web Summary : A shooting at a San Diego mosque left five dead, including two juvenile suspects who allegedly opened fire during prayers. Police are investigating the incident as a potential hate crime, sparking outrage and calls for increased security at religious institutions.