Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 08:14 IST2026-05-19T07:44:49+5:302026-05-19T08:14:56+5:30
Vladimir Putin to Visit China: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बीजिंग दौऱ्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत. ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, आर्थिक सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा करतील.

Vladimir Putin to Visit China: ट्रम्प यांच्यानंतर पुतिन चीनला भेट देणार! शी जिनपिंग यांच्यासोबत 'या' मुद्द्यांवर होणार द्विपक्षीय चर्चा
Vladimir Putin to Visit China: दोन दिवसापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनचा दौरा केला. या दौऱ्याची जगभरात चर्चा झाली. आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन मंगळवारी चीनला भेट देणार आहेत, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षानंतर लगेचच रशियानेही चीनचा दौरा आखला आहे. यामुळे जगभरात चर्चा सुरू आहेत.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी सांगितले की, शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतिन द्विपक्षीय संबंध, विविध क्षेत्रांतील सहकार्य, तसेच परस्पर हिताच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील.
Fuel Price Hike: मोठी बातमी! पेट्रोल-डिझेल पुन्हा महागले; पाहा मुंबई, पुण्यातील आजचे वाढलेले दर...
पुतिन यांचा चीनचा दोन दिवसांचा दौरा
व्लादीमीर पुतिन १९ आणि २० मे रोजी चीनच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर असतील, तिथे ते चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतील.
पुतिन यांचा चीनचा २५ वा दौरा
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गुओ जियाकुन यांनी सांगितले की, पुतिन यांचा चीनचा २५ वा दौरा असणार आहे. हा दौरा २००१ च्या चीन-रशिया मैत्री कराराच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त होत आहे. दोन्ही नेते फक्त द्विपक्षीय संबंधांना नव्या उंचीवर नेण्यावरच चर्चा करणार नाहीत, तर आर्थिक सहकार्य आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय व प्रादेशिक मुद्द्यांवर देखील विचारांची देवाणघेवाण करतील.
पुतिन यांच्या दौऱ्यावर जगाचे लक्ष
गेल्या वर्षातील सप्टेंबरमध्ये ज्यावेळी पुतिन यांनी चीनला भेट दिली, तेव्हा शी जिनपिंग यांनी त्यांना 'जुना मित्र' म्हटले होते आणि पुतिन यांनी त्यांना 'प्रिय मित्र' म्हटले होते.
आपल्या भेटीदरम्यान, ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासोबत व्यापार आणि इराणमधील सुरू असलेले युद्ध यांसारख्या संवेदनशील विषयांवर चर्चा केली. पुतिन यांच्या भेटीमुळे बीजिंग पुन्हा एकदा जागतिक राजनैतिक घडामोडींचे केंद्र बनले आहे.