San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 08:34 IST2026-05-19T08:25:36+5:302026-05-19T08:34:51+5:30

US mosque attack : अमेरिकेतली कॅलिफोर्नियात एका मशिदीबाहेर अंदाधूंद गोळीबार करण्यात आला. यात तीन लोकांचा मृत्यू झाला, तर काही जखमी झाले आहेत. तर गोळीबार करणाऱ्यांच मृतदेह पोलिसांना एका कारमध्ये मिळाले.

San Diego Firing: 'My son took a weapon'; Mother called the police, mosque shaken by attack by 17 and 19-year-old boys | San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली

San Diego Firing : 'माझा मुलगा...'; आईने पोलिसांना केला होता कॉल, १७ आणि १८ वर्षाच्या मुलांच्या हल्ल्याने मशीद हादरली

San Diego Mosque Shooting : अमेरिकेतील कॅलिफोर्नियात असलेल्या सर्वात मोठ्या मशिदीबाहेर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली. इस्लामिक सेंटर असलेल्या या मशि‍दीला दोन अल्पवयीन मुलांकडून लक्ष्य करण्याचा प्रयत्न झाला. आरोपींनी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या एका मुलाच्या आईने पोलिसांना आधीच कॉल करून याबद्दल माहिती दिली होती, अशी माहिती या घटनेबद्दल समोर आली आहे. 

मशिदीबाहेर झालेल्या गोळीबाराने अमेरिकेत खळबळ उडाली. पण, गोळीबार करणारे कुख्यात गुंड किंवा शार्पशुटर नव्हते, तर १७ आणि १८ वर्षांची दोन मुले होती. दोघांनीही मशिद आणि इस्लामिक सेंटर असलेल्या ठिकाणावर गोळीबार केला. काही मिनिटांतच ही घटना घडली. 

कारमध्ये मिळाले गोळीबार करणाऱ्यांचे मृतदेह 

अचानक झालेल्या या गोळीबारामुळे लोक घाबरले आणि जीव वाचवण्यासाठी पळू लागले. त्यात गोळी लागून तीन लोकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपींचा नंतर माग काढला, तेव्हा दोघांचे मृतदेह एका कारमध्ये आढळून आले. त्यांनी स्वतःवरच गोळ्या झाडून आत्महत्या केली. 

एका मुलाचे आईने पोलिसांना केला होता कॉल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोळीबारानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केलेल्या एका मुलाचे आईने घटनेच्या दोन तास आधीच कॉल केला होता. 

मुलाच्या आईने पोलिसांना सांगितले होते की, माझा मुलगा आत्महत्या करण्याच्या विचारात आहे. आमच्या घरातून काही शस्त्रे आणि कार गायब आहेत. त्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. पोलिसांनी त्याच्या शाळेजवळही बंदोबस्त वाढवला होता. पोलीस त्याच्या शाळेजवळ नजर ठेवून असतानाच सॅन डिएगो येथील इस्लामिक सेंटरमध्ये गोळीबार झाल्याची माहिती पोलिसांना कळली. 

बागकाम करणाऱ्यावरही झाडली गोळी

सॅन डिएगो पोलीस प्रमुख स्कॉट वाल यांनी सांगितले की, आम्हाला कॉल करून माहिती देण्यात आली. त्यानंतर चार मिनिटांमध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचले. तिथे मशिदीबाहेर तीन लोक मृतावस्थेत पडलेले पोलिसांना दिसले. त्यानंतर पोलिसांनी त्या शाळेशी संबंधित मुलांचा शोध सुरू केला. पोलिसांना आणखी बाजूच्या परिसरातच गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. तिथे एका बागकाम करणाऱ्यांवर गोळी झाडण्यात आली होती, पण तो वाचला आहे.

इस्लामिक सेंटरपासून काही अंतरावर रस्त्याच्या मध्ये पोलिसांना एक गाडी दिसली. त्या गाडीजवळ पोहोचल्यानंतर पोलिसांना आतमध्ये दोन मुलांचे मृतदेह दिसले. प्राथमिक तपासातून असे दिसत आहे की, दोघांनी स्वतःवरच गोळी झाडून आत्महत्या केली. 

Web Title : सैन डिएगो मस्जिद में गोलीबारी: माँ का फोन, किशोरों के हमले से दहशत

Web Summary : सैन डिएगो की एक मस्जिद में 17 और 19 साल के दो किशोरों की गोलीबारी में तीन लोगों की मौत हो गई। एक हमलावर की माँ ने हमले से पहले पुलिस को उसकी आत्महत्या की प्रवृत्ति और गायब हथियारों के बारे में चेतावनी दी थी। बाद में हमलावर एक कार में मृत पाए गए।

Web Title : San Diego Mosque Shooting: Mother's Call, Teen Attack Shakes Community

Web Summary : A San Diego mosque shooting by two teens, aged 17 and 19, left three dead. The mother of one shooter had warned police of his suicidal thoughts and missing weapons before the attack. The shooters were later found dead in a car.