Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले

महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले

Bakery Products Price Hike: दरवाढीमुळे वडापाव, मिसळपाव, सँडविच आणि त्यासंबंधित उत्पादनांच्या किमती वाढणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 13:24 IST2026-05-19T13:23:12+5:302026-05-19T13:24:31+5:30

Bakery Products Price Hike: दरवाढीमुळे वडापाव, मिसळपाव, सँडविच आणि त्यासंबंधित उत्पादनांच्या किमती वाढणार!

Bakery Products Price Hike: Another blow to middle class! After petrol-diesel and milk, now bread prices have increased in Mumbai | महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले

महागाईचा आणखी एक झटका! पेट्रोल-डिझेल अन् दुधानंतर आता मुंबईत ब्रेडचे दर वाढले

Bakery Products Price Hike:मुंबईकरांच्या दिवसाची सुरुवात वडापाव, मिसळपाव, सँडविच किंवा ब्रेड-बटरने होते. मात्र, आता या खाद्यपदार्थांसाठी मुंबईकरांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. इंधन दरवाढ, दूध आणि सोन्या-चांदीच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे जनता आधीच होरपळत होती, त्यातच आता मुंबईत ब्रेड आणि बेकरी उत्पादनांच्या किमतीत ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. 

मध्यपूर्व आशियातील वाढत्या तणावाचा परिणाम आता दैनंदिन आयुष्यावरही दिसू लागला आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती, सोने-चांदी आणि दुधाच्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांच्या नाश्त्यावरही महागाईचा फटका बसला आहे. मुंबईत ब्रेड आणि त्यासंबंधित उत्पादनांच्या किमतीत प्रति पॅकेट ५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ १६ मेपासून लागू करण्यात आली आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणावर लोक सकाळच्या नाश्त्यासाठी ब्रेड, पाव, सँडविच, वडापाव आणि इतर पदार्थांवर अवलंबून असतात, त्यामुळे या दरवाढीचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ब्रेडच्या किमती का वाढल्या?

ब्रेडच्या किमतीत झालेल्या वाढीमागे अनेक कारणे समोर आली आहेत. अहवालानुसार, ब्रेड पॅकेजिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पावडरच्या वाढत्या किमती हे प्रमुख कारण मानले जात आहे. या कच्च्या मालाची मोठ्या प्रमाणावर आयात केली जाते. मात्र, रुपयाच्या घसरत्या मूल्यमुळे आयात खर्च वाढला, पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढला, ब्रेडमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रिझर्वेटिव्ह्जचे दर वाढले, तर उत्पादन खर्चातही वाढ झाली. या सर्वांचा परिणाम म्हणून उत्पादकांनी दरवाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.

दरवाढीनंतर विविध ब्रेडच्या किमती(अंदाजे) पुढीलप्रमाणे:

ब्रेडचा प्रकारजुने दर (रुपये)नवे दर (रुपये)
सँडविच ब्रेड (४०० ग्रॅम)₹४०₹४५
होल व्हीट ब्रेड (गव्हाची ब्रेड)₹५५₹६०
मल्टीग्रेन ब्रेड₹६०₹६५
ब्राउन ब्रेड₹४५₹५०
लहान ब्राउन ब्रेड₹२८₹३०
व्हाईट ब्रेड ₹२०₹२२

Web Title : पेट्रोल, डीजल और दूध के बाद मुंबई में ब्रेड के दाम बढ़े

Web Summary : मुंबईकरों को एक और झटका! पेट्रोल, डीजल और दूध के बाद अब ब्रेड की कीमतों में ₹5 प्रति पैकेट की वृद्धि हुई। रुपये की कमजोरी के कारण बढ़ती पैकेजिंग लागत, ईंधन की कीमतें और आयात खर्च जिम्मेदार हैं, जिससे नाश्ते की वस्तुएं प्रभावित हो रही हैं।

Web Title : Mumbai Bread Prices Rise After Petrol, Diesel, and Milk Hikes

Web Summary : Mumbai residents face another blow as bread prices increase by ₹5 per packet, following hikes in petrol, diesel, and milk. Rising packaging costs, fuel prices, and import expenses due to the rupee's depreciation are to blame, impacting breakfast staples.