Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 11:18 IST2026-05-19T10:27:22+5:302026-05-19T11:18:23+5:30

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News Live Updates 19 May 2026 Neet paper leak rcc shivraj motegaonkar petrol prices hike diesel prices fuel crisis PM narendra modi in UAE strait of hormuz bmc Mumbai ritu tawde devendra fadnavis donald trump china | Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये

Top Marathi News LIVE: श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, चावा घेणारी भटकी कुत्री जाणार 'शेल्टर होम'मध्ये

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

19 May, 26 : 11:27 AM

वल्यात राष्ट्रवादीकडून “वैद्यकीय मदत कक्ष” सुरू

येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातील एकही नागरिक वैद्यकीय सेवेपासून वंचित राहू नये, या उद्देशाने माजी खासदार समीर भुजबळ यांच्या पुढाकारातून येवला येथील कार्यालयात “वैद्यकीय मदत कक्ष” या लोकहिताच्या महत्त्वपूर्ण उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला हा उपक्रम गरजू, गरीब आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार ठरणार आहे.

19 May, 26 : 11:15 AM

श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या, सार्वजनिक ठिकाणांवरून हटवली जाणार भटकी कुत्री

भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या श्वान प्रेमींच्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळल्या. मोकाट कुत्र्यांचे लहान मुले, वृद्ध आणि माणसांवरील हल्ले दुर्लक्षित करता येणार नाही. भटकी कुत्री सार्वजनिक सुरक्षेसाठी एक चिंतेचा विषय बनली आहेत. या समस्येने खूप गंभीर रुप धारण केलेले आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. 

त्यामुळे शेल्टर होममध्ये असलेल्या कुत्र्यांना पुन्हा त्यांच्या मूळ ठिकाणी सोडण्यासंदर्भातील याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. न्यायालयाने जुने आदेश कायम ठेवत नव्याने काही आदेश दिले आहेत. 

19 May, 26 : 10:55 AM

वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेरील अतिक्रमणावर कारवाई

 

19 May, 26 : 10:45 AM

पेट्रोल-डिझेल दरवाढीवरून काँग्रेसची केंद्र सरकारवर टीका

पेट्रोल-डिझेलच्या दरात मंगळवारी वाढ झाली. काँग्रेसने यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

19 May, 26 : 10:45 AM

तुर्भे डंपिंग ग्राउंड प्रश्न चिघळला; संतप्त नागरिकांनी कचरा गाड्यांची हवा काढून वाहने रोखली

नवी मुंबईतील तुर्भे डंपिंग ग्राउंड आणि प्रस्तावित कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांचे आंदोलन तीव्र झाले आहे. स्थानिक नगरसेवक Suresh Kulkarni यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणानंतर आता संतप्त नागरिकांनी डंपिंग ग्राउंडकडे जाणाऱ्या कचरा वाहतूक गाड्या अडवून त्यांच्या चाकांतील हवा काढली. प्रशासनाकडून अद्याप कोणतेही लेखी आश्वासन न मिळाल्याने आंदोलन आणखी चिघळले आहे.

19 May, 26 : 10:40 AM

पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ...

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत आज पुन्हा एकदा वाढ झाली असून मुंबईत पेट्रोलच्या दरात प्रतिलीटर ९१ पैशांची तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर ९४ पैशांची वाढ झाली आहे.

19 May, 26 : 10:36 AM

मुंबई: महापौरांच्या पाहणी दौऱ्यात फज्जा

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आज मुंबईतील पम्पिंग स्टेशनचा पाहणी दौरा आयोजित केला. यावेळी दौऱ्यात इलेक्ट्रिक बेस्ट बसचा वापर करण्यात आला. पण ऐनवेळी बेस्टची बसच बंद पडली आणि कर्मचाऱ्यांना बसला धक्का मारावा लागला. 

19 May, 26 : 10:30 AM

मुंबईत पावाच्या किमतीत वाढ

मुंबईत महागाईचा आणखी एक फटका बसला असून, पाव आणि ब्रेडच्या दरात ५ रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. इंधन दरवाढ, पॅकेजिंग साहित्याचा वाढता खर्च आणि कच्च्या मालाची महागाई यामुळे बेकरी उद्योगाने हे दर वाढवले आहेत.

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 19 May 2026 Neet paper leak rcc shivraj motegaonkar petrol prices hike diesel prices fuel crisis PM narendra modi in UAE strait of hormuz bmc Mumbai ritu tawde devendra fadnavis donald trump china